स्वच्छतागृह, कचरा कुंडीतील दुर्गंधीमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:36 AM2019-02-03T02:36:51+5:302019-02-03T02:37:03+5:30

रविवार पेठेतून मनीष मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरच महानगरपालिकेची कचरा कुंडी असून त्यामधला कचरा हा सगळा रस्त्यावर पडला आहे. स्वच्छतागृहाच्यासमोरच कचरा कुंडी असल्याने स्वच्छतागृह आणि कचरा कुंडी यांच्या दुर्गंधीने स्थानिक व्यापारी त्रस्त झाले आहेत.

Sanitary gear, trash garbage trash merchants, civilians suffer | स्वच्छतागृह, कचरा कुंडीतील दुर्गंधीमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त

स्वच्छतागृह, कचरा कुंडीतील दुर्गंधीमुळे व्यापारी, नागरिक त्रस्त

Next

- प्रीती ओझा / अविनाश फुंदे  

पुणे  - रविवार पेठेतून मनीष मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरच महानगरपालिकेची कचरा कुंडी असून त्यामधला कचरा हा सगळा रस्त्यावर पडला आहे. स्वच्छतागृहाच्यासमोरच कचरा कुंडी असल्याने स्वच्छतागृह आणि कचरा कुंडी यांच्या दुर्गंधीने स्थानिक व्यापारी त्रस्त झाले आहेत. पालिकेची सार्वजनिक कचरा कुंडी व स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नसल्याचे वास्तव चित्र असून, तेथे दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केवळ देखभाल-दुरुस्तीअभावी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून व्यापाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता हे आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे.

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
अपुºया स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, पुरेशा स्वच्छतेचा अभाव शहर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती महापालिकेने करणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारीही स्वच्छतागृहे नागरिकांसाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य करणार का, असा प्रश्न येणारे पर्यटक विचारत आहेत.
मात्र या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आणि अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहांची स्वच्छता व्यवस्थित होताना दिसत नाही. हात धुण्यासाठी असलेल्या वॉशबेसीनचे पाईप तुटलेल्या अवस्थेत असून त्याचे पाणी खाली जमिनीवर पडत असल्याने पाय घसरून पडल्याचे अनेकांनी सांगितले. लघुशंका करण्यासाठी गेल्यानंतर तेथे पाणी सोडण्याची सुविधा नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे आढळून आले आहे.

1 रविवार पेठ हा परिसर खरेदी - विक्रीचे केंद्रबिंदू असल्याकारणाने येथे कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळे येथे येणाºया नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून जावं लागत असल्याची परिस्थिती दिसत आहे. पालिकेच्या स्वच्छतेअभावी या स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय दयनीय असून वर जाण्यासाठीचा लोखंडी जिना पूर्णपणे खराब झालेला आहे. तो अचानक कोसळून दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

2ही अशी स्वच्छतागृहाची अवस्था असतानाच त्यात कचरा कुंडीतील कचºयाची भर पडली आहे. या सततच्या दुर्गंधीमुळे दुकानदार आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका तयार झाला असून त्यामुळे आम्हाला दुकान बंद करायची वेळ आल्याची तक्रार दुकानदार करीत आहेत. वारंवार महानगरपालिकेला तक्रार करूनदेखील त्यांच्याकडून काहीच ठोस कारवाई केली जात नाही.

3 तक्रार केल्यावर तेवढ्यापुरते महापालिकेचे कर्मचारी येऊन जातात; परंतु दुसºया दिवशीपासून ‘जैसे थे’ परिस्थिती होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेने तातडीने ही कचरा कुंडी हटवून वेळोवेळी स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करत आहेत.

आम्हाला मुतारीचा खूप वास येत असून या वासाचा त्रास आहेच; परंतु दुकानात येणाºया ग्राहकांवरही याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. दुर्गंधीमुळे ग्राहक इथे थांबतच नाहीत. महापालिकेला अनेकदा तक्रार करूनदेखील त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. - आशू प्रजापती, दुकानदार

कचरा पेटीपेक्षा मुतारीचा खूप त्रास आहे. त्या वासामुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. जर कुणी अधिकारी येणार असतील तर महापालिकेचे कर्मचारी येऊन फक्त बाहेरूनच पावडर टाकून जातात. आतमध्ये अक्षरश: किडे तयार झाले असून ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. - राजेश पिंपळे, दुकानदार

लोकांना तोंडाला रुमाल लावून रस्त्याने जावे लागत असल्याने ते दुकानात थांबतच नाहीत. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेस जास्त वास येतो नेमका हीच धंद्याची वेळ असते. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. - नीलेश पवार, दुकानदार

व्यापारी म्हणतात...
पालिकेची घंटा गाड्यांमधून कचरा गोळा करतात, परंतु ती गाडी गेली की कचºयाचा प्रश्न ‘जैसे थे’ होतो. समोरच्या बाजूस असलेल्या स्वच्छतागृहामुळे अनेकदा आमचे कामगार आजारी पडतात. ही स्वच्छतागृहे इतकी अस्वच्छ असतात. या सर्व घाणीच्या साम्राज्यामुळे इथे घुशींचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई पसरण्यची शक्यता जास्त दिसते. या रोजच्या त्रासाला कंटाळून आता आम्ही दुकान बंद करू की काय, असा प्रशन पडतो. आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे या परिसरातील कचरापेटी पालिकेने लवकरात लवकर काढून टाकावी आणि व्यापाºयांना रोगराईपासून मुक्त करावे.
- अक्षय राठी,
रविवार पेठ व्यापारी
 

Web Title: Sanitary gear, trash garbage trash merchants, civilians suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे