स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री; रेल्वे सल्लागार सदस्यांनी विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 10:06 IST2025-03-01T10:03:08+5:302025-03-01T10:06:27+5:30
पुणे व शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील हॉटेलच्या किचनची पाहणी केली

स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री; रेल्वे सल्लागार सदस्यांनी विचारला जाब
पुणे : पुणेरेल्वे स्थानकावर खराब पदार्थ विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी आयआरसीटीसी व रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, पुणे व शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरील हॉटेलच्या किचनची पाहणी केली.
पुणे रेल्वे स्थानकावर एका स्टॉल विक्रेत्याकडून खराब वडापाव विक्री केली जात असल्याचे समोर आले होते. पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाच्या सदस्यांनी त्या स्टॉलधारकाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला होता. खराब पदार्थाची विक्री होत असताना आयआरसीटीसी व रेल्वे प्रशासनाकडून काहीही पाहणी केली जात नव्हती. हा एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
@RailMinIndia@GM_CRly@RailwaySeva
— पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@PuneGraminSena) February 26, 2025
पुणे रेल्वे स्टेशन येथे @IRCTCofficial fast food service स्टॉल धारकांकडून खराब आणि वास येणारे पदार्थ विकले जात आहे. ज्यामुळे प्रवाश्याचे जीव धोक्यात आहे. जेव्हा आमच्या प्रतिनिधी कडून विचारण्यात आले, तेव्हा स्टॉलवाल्याकडून वाद घालण्यात आला. pic.twitter.com/AxhB5pfJdE
याबाबत प्रादेशिक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी, बिभीषण जाधव, डॉ. आदित्य पतकराव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पुणे, हडपसर, चिंचवड, शिवाजीनगर शुक्रवारी पहाणी केली. तसेच, आयआरसीटीच्या अधिकाऱ्यांना जाऊन याबाबत जाब विचारला. त्यानंतर पुणे, शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे जाऊन तेथील स्टॉल येथील पदार्थ, हॉटेलची किचन याची आतमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी रेल्वेचे अधिकारीदेखील सोबत होते.