शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, चौकीत तक्रार का नाही नोंदवीत?

By admin | Updated: February 16, 2015 04:36 IST

पुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्हे ठाण्यातच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकीतील अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे.

मंगश पांडे, पिंपरीपुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्हे ठाण्यातच दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकीतील अधिकाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे. हे अधिकारी आता बिनधास्त झाले असून, तक्रारदारांवर तक्रार दाखल करण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. चौकीत गेलेल्या तक्रारदाराला ठाण्यात जाण्यास सांगितल्यास तक्रारदारामध्येच पोलिसांबाबत गैरसमज निर्माण होत आहे. रोडरोमिओंच्या छेडछाडीने त्रस्त झालेल्या भोसरीतील अश्विनी शरद वारकड या युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचा १८ जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच व्यवस्थित तक्रार नोंदवून न घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. याप्रकरणाची दखल घेत पुण्याच्या पोलीस सहआयुक्तांनी दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यातच करण्याचे आदेश दिले आहेत. निगडी पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. निगडी गावठाण, आकुर्डी, रावेत, चिखली यासह ओटास्किम, कुदळवाडी या संवेदनशील भागांचा या ठाण्याच्या हद्दीत समावेश होतो. त्यासाठी या ठाण्यांतर्गत यमुनानगर, आकुर्डी, प्राधिकरण, सानेवस्ती, कुदळवाडी, रूपीनगर अशा सर्वाधिक सहा चौक्या आहेत. चिखली, कुदळवाडीपासून निगडी पोलीस ठाण्याचे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे. तक्रार द्यायची असल्यास तक्रारदाराला पाच किलोमीटर अंतरावर जावे लागते.