शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एनओसी मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या आरटीओ एजंटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST

पुणे : पिंपरी आरटीओकडून पुणे आरटीओकडे गाडी ट्रान्सफर करण्यासाठी एनओसी मिळवून देण्यासाठी लाच मागणार्या एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ...

पुणे : पिंपरी आरटीओकडून पुणे आरटीओकडे गाडी ट्रान्सफर करण्यासाठी एनओसी मिळवून देण्यासाठी लाच मागणार्या एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. अक्षय मारुती माळवे (वय २४, रा. गंगानगर सिसोदिया मार्केटजवळ, आकुर्डी) असे या खाजगी एजंटचे नाव आहे.

तक्रारदार यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यांची एनओसी आरटीओ कार्यालयातून देण्यासाठी खर्च येईल, असे सांगून अक्षय माळवे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच मागताना तुमची फाईल ५ टेबलवरुन फिरते. त्या सर्व टेबलवरील अधिकारी व कर्मचार्यांना पैसे द्यावे लागतात, असे त्याने सांगितले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा माळवे याने १३०० रुपये घेण्याची कबुली दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोशी येथील आरटीओ कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी सापळा लावला. त्यात तक्रारदाराकडून पैसे घेताना अक्षय माळवे याला पकडण्यात आले. भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.