शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशप्रक्रिया ठप्पच!

By admin | Updated: September 6, 2015 03:35 IST

दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संस्थाचालकांच्या भेटीनंतर आदेशाच्या स्पष्टतेसाठी विधी

पुणे : दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संस्थाचालकांच्या भेटीनंतर आदेशाच्या स्पष्टतेसाठी विधी विभागाकडून अहवाल मागविला. त्यानंतर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितले. त्यास ५ दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही कोणत्याही पद्धतीची स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील मुलांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया ठप्पच आहे. परिणामी शालाबाह्य मुले अद्यापही शाळेपासून दूरच आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के आरक्षित जागांच्या तरतुदीवर दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक व पूर्व प्राथमिक या दोन्ही स्तरांवर प्रवेश देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत. पुण्यात शाळांमधील आरक्षित राखीव जागांबाबत काही खासगी शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे शिक्षण मंडळाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून शिक्षण विभाग आमच्यावर कारवाई करीत असल्याचा कांगावा करत संस्थाचालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत तावडे यांनी संस्थाचालकांचे लेखी म्हणणे, विधी विभागाकडून तपासून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र त्याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवेशप्रक्रिया ठप्प आहे. प्रवेशाबाबत गोंधळ उडाला आहे. (प्रतिनिधी)आरटीई प्रवेशप्रक्रियेविषयी अद्यापपर्यंत शिक्षण संचालनालयातून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी आरटीई प्रवेशप्रक्रिया ठप्पच आहे. काही खासगी संस्था त्यांच्या पद्धतीने प्रवेश देत असतील तर त्या सुरू असतील; मात्र बाकी प्रवेशप्रक्रिया थांबलेली आहे. दोन दिवसांपूर्वीही आम्ही याबाबत चौकशी केली होती, मात्र कोणतीच माहिती मिळू शकली नाही. पुढील आठवड्यात मंगळवारपर्यंत सूचना मिळणे अपेक्षित आहे.- बबन दहिफळे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रमुख