वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

By विवेक भुसे | Updated: February 19, 2024 11:12 IST2024-02-19T11:10:59+5:302024-02-19T11:12:18+5:30

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते....

Rohidas Jadhav, who was set on fire in front of Wagholi police station, died during treatment | वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या रोहिदास जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, याची चौकशीसाठी आलेल्या तरुणाला अपमानास्पद वागणूक दिल्याने त्या तरुणाने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेतले होते. उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी वाघोली पोलीस चौकीसमोर घडली होती. त्यात जाधव ९५ टक्के भाजला होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. रोहिदास जाधव याने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली केली होती.

Web Title: Rohidas Jadhav, who was set on fire in front of Wagholi police station, died during treatment