शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी मारहाण करून लुटले

By admin | Updated: January 16, 2015 23:59 IST

रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण करून सुमारे ७0 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मलठण येथील गुरववस्तीत संतोष गायकवाड यांच्या घरात घडली

शिरूर : रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण करून सुमारे ७0 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मलठण येथील गुरववस्तीत संतोष गायकवाड यांच्या घरात घडली. काठीने मारहाण केल्याने गायकवाड यांच्या कुटुंबातील चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, की आज (१६ जानेवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय झोपेत असताना घराच्या सेप्टी डोअरचा आवाज आला. संशय आल्याने संतोष यांनी शेजारी राहत असलेला त्यांचा भाऊ भानुदास यास मोबाईलवरून फोन करून बाहेर कोण आहे हे पाहण्यास सांगितले असता, त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून कोणीतरी बंद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संतोष याने दरवाजा उघडल्याने २0 ते ३0 वयाच्या चौघा चोरट्यांनी दरवाजा उघडताच काठीने मारहाण केली. त्यांच्याजवळ लोखंडी कटावणीही होती. संतोष घाबरून रस्त्याकडे पळाले व आरडाओरड केली. आजूबाजूच्या लोकांना जागे करून संतोष घराकडे परत आले असता चौघे चोरटे पळून गेले. त्यांनी संतोष यांची मुलगी प्रणाली (११), पत्नी माया यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. मुलीच्या कानातील ओरबाडून काढल्याने तिच्या कानाला जखम झाली आहे. भाऊ भानुदास यांनाही मारहाण केली. घरातील १ हजार रोख रखमेसह चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, १ हजाराचे चांदीचे दागिने असा सुमारे ६९ हजार ७५0 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरटे मराठी भाषेत बोलत होते. त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशनला कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)