शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

अतिवृष्टीला बळी पडलेल्या कांद्यावर फिरवला नांगर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 8:41 PM

खेड तालुक्यात सुमारे १४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

ठळक मुद्देऑक्टोबरमधील अर्थातच रब्बीचे सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र बाधित बटाटा, बाजरी, मका, ज्वारी, फ्लॉवर, कोबी, पालेभाज्या आदी पिकांचा सहभाग

शेलपिंपळगाव : कांदा पिकाचे आगर असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात अतिपावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात सुमारे १४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून भात व कांद्याचे सर्वाधिक पीक पावसामुळे वाया गेले आहे. यापार्श्वभूमीवर शासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. दरम्यान, खेडच्या पूर्व तसेच शिरूरच्या पश्चिम भागात काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक शेतातच नांगरून टाकले आहे.           उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतात. काही वेळा तोट्यात गेलेला कांदा अनेक वेळा भरघोस पैसा देऊन जात असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे मोठ्या प्रमाणात कल असलेला दिसून येत आहे. यंदा मात्र या पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिपावसामुळे पाणी आणले आहे. अनेक भागात पीक लागवडीनंतर चांगल्या स्थितीत होते. काही गावांमध्ये लागवड करून महिना - दोन महिने झाले होते. मात्र,  पावसाने पाठ सोडली नाही आणि सद्यस्थितीत कांदा शेतात सोडावा लागत आहे.       शासनाने केलेल्या पंचनाम्यात कांदा व भात पिकाचे नुकसान ठळकपणे दिसून येत आहे. त्यासोबत बटाटा, बाजरी, मका, ज्वारी, फ्लॉवर, कोबी, पालेभाज्या आदी पिकांचा सहभाग आहे. खेड तालुक्यात खरिपातील २१३४ हेक्टर क्षेत्र तर ऑक्टोबरमधील अर्थातच रब्बीचे सुमारे १२०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.              अतिपावसाने कांदा हाती येण्यापूर्वीच काढून टाकावा लागत आहे. शिल्लक कांद्यावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर मोठा खर्च येत आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी करण्याची मागणी सयाजीराजे मोहिते, सुभाष वाडेकर, संजय मोहिते, सजेर्राव मोहिते, बाळासाहेब दौंडकर, सागर रोडे, दिवाण पऱ्हाड, देवराम सुक्रे, सतीश पऱ्हाड , पांडुरंग बवले, विलास मोहिते आदींनी केली आहे.

करंदी हद्दीतील शेतकरी बाळू कदम यांनी त्यांच्या दीड एकरमधील कांद्यावर ट्रॅक्टरच्या मदतीने नांगर फिरवला आहे. अजित पऱ्हाड यांनी कांद्यात मेंढ्या सोडल्या. तर पऱ्हाडवाडीतील सागर रोडे यांनी त्यांचा कांदा उपटून टाकला आहे. एकीकडे पिकाच्या लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करायचे आणि तोच कांदा हातात येण्यापूर्वीच विनामोबदला काढून टाकायचा अशी विदारक परिस्थिती पीक उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवल्याचे सर्रास दिसून येत आहे.

...............

शासनाने नुकसानग्रस्त पिकांना ८ हजार रुपये हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई जाहीर केली आहे. कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत एका हेक्टरला कमीत कमी ४० हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली भरपाई पिकांवर आत्तापर्यंत केलेल्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पीक उत्पादक शेतक?्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.

" खेड तालुक्यात अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत कमी आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी शासन निर्णय २०१५ नुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे  - दिलीप मोहिते - पाटील , आमदार खेड.         " तालुक्यात तब्बल चौदा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेताच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. शासन निर्णय २०१५ व शासन निर्णय २०१९ नुसार नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकाकडे सादर केला आहे. - व्ही.डी. वेताळ, साहाय्यक कृषी अधिकारी खेड.

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती