शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम अपूर्र्ण; मात्र टोल आकारणी पूर्ण

By admin | Updated: June 12, 2014 05:24 IST

येथे रिलायन्स इन्फ्रा संचालित खेडशिवापूर टोल नाक्यावर टोलची आकारणी पूर्ण केली जाते. मात्र ज्याप्रमाणे टोल आकारणी केली जाते,

खेडशिवापूर : येथे रिलायन्स इन्फ्रा संचालित खेडशिवापूर टोल नाक्यावर टोलची आकारणी पूर्ण केली जाते. मात्र ज्याप्रमाणे टोल आकारणी केली जाते, त्याप्रमाणे रस्त्याचे काम मात्र अपूर्णावस्थेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. या महामार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.शिंंदेवाडी ते सारोळा या हमरस्त्यावर नियमित होणाऱ्या अपघाताबाबत व अत्यंत मंद गतीने चालू असलेल्या कामासंदर्भात शिवाय गावोगावी असलेले ओव्हरब्रीज, सर्व्हिस रोड ही कामे प्रामुख्याने प्रलंबीत असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे या महामार्गावर नियमीतपणे छोटे मोठे अपघात होत आहेत आणि यामध्ये प्रसंगी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मोठ्या गावाच्या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता असताना त्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या असून शासन व संबधित एजन्सी या गोष्टींकडे डोळेझाक करीत आहे. विशेषत: सर्व्हिस रोडची कामे न झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये बऱ्याच मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.खेडशिवापूर टोलनाक्यावर यापूर्वी अनेक वेळा विविध प्रश्नांवरती सर्वपक्षीय आंदोलने करण्यात आली. मात्र रिलायन्स इन्फ्राच्या अधिकारी जनतेच्या प्रश्नांबाबत बेफिकीर असल्याचे दिसत आहे. राज्यामध्ये खेडशिवापूर टोल नाका हा नेहमी वादाचाच विषय राहिलेला आहे. इन्फ्रा कंपनी प्रवाशांकडून फक्त टोल वसूल करते मात्र ज्या प्राथमिक गरजेच्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे त्या सुविधा पुरविण्यामध्ये टाळाटाळ करत आहे. महामार्गाचे रुंदीकरण करत असताना अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून ठिकठिकाणी रस्त्यावर वाळूचा थर साचलेला आहे.रस्त्यावर चार पाच ठिकाणी डांबरीकरणाची लेव्हल नीट नसल्यामुळे अपघात झालेले आहेत. अनेकांचे अपघातात प्राण गेले आहेत. याबाबत संबधित एजन्सीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशीही चर्चा चालू आहे. स्थानिक लोकांच्या रस्त्यासाठी जमिनी भूसंपादित केल्या मात्र टोल पास करत असताना त्यांना सुध्दा टोल कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. (वार्ताहर)