शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका उभारणार ‘आरएमसी प्लान्ट’

By admin | Updated: July 8, 2015 02:41 IST

शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत असल्याने त्यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) खासगी ठेकादारांकडून खरेदी न करता त्याचा स्वतंत्र

पुणे : शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे होत असल्याने त्यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) खासगी ठेकादारांकडून खरेदी न करता त्याचा स्वतंत्र प्रकल्प महापालिका प्रशासनाकडून उभारला जाणार आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे आदेश स्थायी समितीने महापालिका प्रशासनास दिले असून, महापालिकेच्या मालकीच्या हॉटमिक्स प्लान्टच्या धर्तीवर हे आरएमसी प्रकल्प असणार आहेत. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेकडून शहरात दरवर्षी शेकडो किलोमीटर डांबरी रस्ते तयार केले जातात. त्यानंतर या रस्त्यांच्या देखभाली व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले डांबर आणि खडीचे मिश्रण तयार करण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा हॉटमिक्स प्लान्ट येरवडा येथे आहे. या वेळी शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्याचे काम सुरू असून, त्याच्या देखभालीसाठी तसेच या रस्त्यांसाठी लागणारे खडी आणि सिमेंटचे मिश्रण खासगी कंपन्यांकडून न घेता, असा प्रकल्प महापालिकेनेच स्वत: करावा, अशी मागणी अनेक समिती सदस्यांनी केली.त्यानुसार, असा प्रकल्प उभारणे शक्य आहे का, तसेच त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे जागा आहे का, याची माहिती समितीस सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे कदम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)