वेळ नदी दुथडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 06:01 IST2015-06-12T06:01:14+5:302015-06-12T06:01:14+5:30

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पुन्हा एकदा दुपारी ४ नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ३ ते ४ तास चाललेल्या पावसाने या भागातील

The river rises at the time! | वेळ नदी दुथडी!

वेळ नदी दुथडी!

पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पुन्हा एकदा दुपारी ४ नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ३ ते ४ तास चाललेल्या पावसाने या भागातील सर्व परिसर हा जलमय झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पावसाचे पाणी वाहत असून, शेतजमिनीचे बांध काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. सर्व शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली आहे. सर्व रस्ते जलमय झाल्याने; तसेच वीजप्रवाह देखील बराच काळ खंडित झाल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी गावडेवाडी, कुदळेवाडी, श्रीरामनगर आदी गावांत; तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांना जोरदार पावसाने झोडपले असून, सर्व परिसर हा जलमय झाला आहे. सर्व रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत आहेत. या भागातील पेठ परिसरातून वाहणारी वेळ नदी ही पेठ परिसरात दुथडी भरून वाहत होती. पेठ गावातून पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या वेळ नदीच्या पुलावरून सुमारे तासभर पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातूनच जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील सर्व वाहतूकही बाहेरून जाणाऱ्या रस्त्याने वळविण्यात आली होती.
पावसाचा जोर सलग तीन तास होता. शेतातून पाण्याचे पाट पाहत आहेत. शेणखत पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामासाठी तयारी सुरू करता येईल. (वार्ताहर)

Web Title: The river rises at the time!