शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वकिलांसाठी ‘विधी’ तयारी करणार

By admin | Updated: January 21, 2015 00:37 IST

अनेकदा सत्याची बाजू असतानाही केवळ पैसा-अडका नसल्याने आणि वकिलाची फी झेपत नसल्याने अनेक गरजवंत न्यायाच्या दारातून माघारी फिरतात.

पुणे : अनेकदा सत्याची बाजू असतानाही केवळ पैसा-अडका नसल्याने आणि वकिलाची फी झेपत नसल्याने अनेक गरजवंत न्यायाच्या दारातून माघारी फिरतात. अशा गरीब आणि गरजू पक्षकारांना मोफत वकील देण्याची सुविधा विधी सेवा प्राधिकरणाकडे उपलब्ध आहे. मात्र पुण्यातील विधी सेवा प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या वकिलांची मोफत सेवा देण्याचा निरुत्साह पाहून आता नव्याने वकिलांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असलेले आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या वकिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने न्यायालयात येणाऱ्या गरीब, गरजू आणि महिलांना मोफत वकील-सुविधा देण्यात येते. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणासाठी वकील म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या वकिलांनी २९ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी केले आहे. न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमध्ये वकील देण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा गरीब, गरजू लोकांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत वकील पुरविण्याची सुविधा आहे. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची नियुक्ती करण्यात आलेली असते. नियुक्ती करण्यात आलेल्या वकिलांना खटल्यानुसार मानधन देण्यात येत असते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे असलेल्या वकिलांची यादी आता नव्याने तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी नेमण्यात आलेल्या वकिलांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच पक्षकारांना त्यांच्या केसेस लढताना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन नवीन यादी तयार करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी रोजी वकिलांची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)