पुणे: मुंढव्यातील वेस्टिन हॉटेलच्या लॉनवर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे लावून स्थानिक रहिवाशांना त्रास देणाऱ्या इव्हेंट मॅनेजर व साऊंड मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इव्हेंट मॅनेजर नीलेश सुंदरराव नाईक (वय ३९, रा. गंगा आर्चिड, मुंढवा) आणि साऊंड मॅनेजर धनाजी मानिक राजगुरू (३९, रा. ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी अक्षय शिंदे यांनी मुंढवापोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास वेस्टिन हॉटेलच्या लॉनवर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्टिन हॉटेलच्या लॉनवर २३ जानेवारी रोजी सायंकाळी एका कंपनीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजर नीलेश नाईक यांनी केले होते. यावेळी बराच वेळ मोठ्या आवाजात डी. जे. लावण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील रहिवासी कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने त्रस्त झाले. रात्री साडेनऊपर्यंत हा प्रकार सुरू होता. तेव्हा रहिवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन डीजे बंद केला. या इव्हेंटसाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कायदेशीर आदेशाची अवाज्ञा केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मुसळे करत आहेत.
Web Summary : Mundhwa residents were disturbed by loud DJ music at Westin Hotel. Police filed a case against the event and sound managers, Nilesh Naik and Dhanaji Rajguru, for causing nuisance and violating noise regulations after receiving complaints from residents.
Web Summary : वेस्टिन होटल में तेज़ डीजे संगीत से मुंधवा के निवासी परेशान थे। पुलिस ने निवासियों से शिकायत मिलने के बाद, कार्यक्रम और ध्वनि प्रबंधकों, नीलेश नाइक और धनाजी राजगुरु के खिलाफ उपद्रव करने और शोर नियमों का उल्लंघन करने के लिए मामला दर्ज किया।