शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन मदतीसाठी ‘रेसरेक्ट’ अ‍ॅप

By admin | Updated: January 25, 2017 02:05 IST

संगणक शास्त्राचे शिक्षण घेतलेले नसताना, इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या पिंपळे

पिंपरी : संगणक शास्त्राचे शिक्षण घेतलेले नसताना, इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या पिंपळे गुरव येथील आशिष कामाठी या विद्यार्थ्याने ‘रेसरेक्ट अ‍ॅप’ तयार केले आहे. कधी वैद्यकीय मदतीची, तर कधी पोलिसांची आणि अग्निशामक दलाची गरज भासेल, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थतीशी सामना करण्याची वेळ येईल, तेव्हा या अ‍ॅपच्या मदतीने संबंधित विभागाकडून तातडीची मदत मिळविणे शक्य होईल. असे हे अ‍ॅप पदोपदी कामी येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश अ‍ॅप हे व्यावसायिकांनी किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केल्याचे दिसून येते. बालपणापासूनच इंटरनेटची आवड असणाऱ्या आशिषने इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. दोन महिने विविध प्रकारच्या ‘अ‍ॅप’चा अभ्यास करून त्याने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत पुरविण्याच्या दृष्टीने अ‍ॅप उपयुक्त ठरणारे आहे, असे त्याचे मत आहे. ३० एमबी क्षमता असलेल्या या अ‍ॅपमध्ये तातडीक वैद्यकीय सेवा, पोलीस यंत्रणेची मदत, अग्निशामक दलाचे तत्काळ साहाय्य, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागांना तव्रित संदेश पोहोचेल, अशी सुविधा आहे. छातीत कळ आली, अपघात झाला अशा वेळी वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास या अ‍ॅपव्दारे तत्काळ मदत प्राप्त होऊ शकते. एखादा गुन्हा समोर घडत असेल, तर त्याचीही थेट माहिती अ‍ॅपद्वारे पोलिसांना कळविणे शक्य होते. तत्काळ पोलीस यंत्रणेचे साहाय्य मिळू शकेल. आपत्कालीन परिस्थितीची माहिती, तसेच मदत मिळण्यासही अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)