Pune Crime: चारित्र्यावर संशय घेत वारंवार छळ; पत्नीचा केला खून, बिबवेवाडीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:58 IST2026-03-26T12:55:53+5:302026-03-26T12:58:19+5:30

२४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास पतीने पत्नीला कठीण वस्तूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली होती

Repeated harassment due to suspicion of character; Wife murdered, shocking incident in Bibvewadi | Pune Crime: चारित्र्यावर संशय घेत वारंवार छळ; पत्नीचा केला खून, बिबवेवाडीतील धक्कादायक घटना

Pune Crime: चारित्र्यावर संशय घेत वारंवार छळ; पत्नीचा केला खून, बिबवेवाडीतील धक्कादायक घटना

बिबवेवाडी : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सारिका शुभम घोडके (वय २३, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय ५०, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिचा वारंवार छळ करत होता. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास त्याने सारिकाला कठीण वस्तूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर शेजाऱ्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कठीण वस्तूने मारहाण झाल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीतूनच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे अपराध: अवैध संबंध के शक में पति ने पत्नी की हत्या की

Web Summary : बिबवेवाड़ी में, एक पति ने अवैध संबंध के शक में अपनी पत्नी सारिका घोडके पर जानलेवा हमला किया। आरोपी शुभम घोडके उसे बार-बार परेशान करता था। गंभीर पिटाई के बाद अस्पताल में उसकी मौत हो गई। पुलिस ने शुभम को गिरफ्तार कर लिया, और जांच जारी है।

Web Title : Pune Crime: Husband Murders Wife Over Suspicion of Infidelity

Web Summary : In Bibwewadi, a husband fatally attacked his wife, Sarika Ghodke, due to suspicions of infidelity. The accused, Shubham Ghodke, repeatedly harassed her. After a severe beating, she died in the hospital. Police arrested Shubham, and an investigation is underway.