मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:04 IST2026-02-02T16:03:06+5:302026-02-02T16:04:06+5:30
आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये, त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी
पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच या मुंढवा गैरव्हवहार प्रकरणात पोलिसांच्या चार्जशीटमध्ये त्यांचे नाव न आल्याने पार्थ यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर आणि दिग्विजय सिंह पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे, या जमीन प्रकरणी फक्त शितल तेजवानी विरोधात आरोप ठेवण्यात आले असल्याचे चार्जशीट मध्ये दिसून आले आहे. या दोषारोपपत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर आज ही मोठी घडामोडी समोर आली आहे.
शीतल तेजवानी मुख्य आरोपी
आर्थिक गुन्हे विभागाने दाखल केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून त्यांच्यावरच सर्व आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत.
पार्थ पवारांना दिलासा
या जमिनीच्या व्यवहारात पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले होते, मात्र पुराव्यांच्या अभावी किंवा तपासाअंती त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.
अंजली दमानिया यांची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी ही मोठी कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.