शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

३५ गुंठ्यात दहा टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:08 IST

--- राजुरी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथील शेतकरी रामदास विश्वनाथ पवार यांनी आपल्या ३५ गुंठे क्षेत्रात १० टन ...

---

राजुरी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथील शेतकरी रामदास विश्वनाथ पवार यांनी आपल्या ३५ गुंठे क्षेत्रात १० टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन काढले आहे. यामधून त्यांना ९० हजार रुपयांचा नफा झाला आहे. वडगाव कांदळी येथील रामदास पवार यांनी ३५ गुंडे क्षेत्रात ३.५ क्विंटल (७ कट्टे प्रत्येकी पन्नास किलो) बटाटा बियाण्याची लागवड केली होती. पुखराज १६६ या जातीचे बटाटा बियाणे ६ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणावरून खरेदी केले होते. लागवडीपूर्वी शेणखत व कोंबडी खत या खतांचा वापर केला होता. बटाटा लागवड ही ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली. लागवडीवेळी १०.१०.२६ या खतांचा वापर तसेच ठिबकच्या माध्यमातून विद्राव्य खतांची मात्रा वेळोवेळी दिली होती. यावर्षी ढगाळ हवामानामुळे पाच ते सहा फवारण्या घ्याव्या लागल्या होत्या याबाबत त्यांना नीलकंठ भोर व संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. बटाट्याची काढणी दिनांक ३३ डिसेंबर रोजी केली असून ८३ दिवसांच्या कालावधीत त्यांना २०० पिशव्या(१० टन) उत्पादन मिळाले. बैलांच्या साह्याने बटाट्याची काढणी करून शेताच्या बांधावर व्यापाऱ्याला त्यांनी विक्री केली. १५रुपये प्रति किलो दराने विक्री करून त्यांना १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामधून त्यांचा ६० हजार रुपये खर्च वजा जाता ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

--

कोट

मी गेली २५ वर्षापासून बटाट्याचे पीक घेत असून यावर्षी प्रतिकूल हवामान राहूनही मला बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. सेंद्रिय खतांचा वापर, योग्य नियोजन, वेळोवेळी औषध फवारणी, यामुळे मला हे उच्चांकी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. अचानक बाजारभाव कमी झाल्याने मला होणाऱ्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

रामदास पवार,

वडगाव कांदळी बटाटा उत्पादक शेतकरी

--

२६राजुरी बटाट उत्पादन

फोटो ओळी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर)येथील बटाटयाचे भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी

Attachments area