शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलीस ठाण्याची पुर्नरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे त्यांच्या तपासासाठी सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे त्यांच्या तपासासाठी सुसूत्रता यावी, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलीस ठाण्याची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार, आता गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ५ युनिटची स्थापना केली आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार त्या-त्या युनिटकडे संबंधित गुन्हे सोपविले जाणार आहेत. सध्या एकाच तपास अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जातात. त्याऐवजी आता तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.

हॅकिंग/डाटा चोरी, ऑनलाइन बिझनेस फ्रॉड, चीटिंग फ्रॉड, सोशल नेटवर्किंग आणि एटीएम कार्ड फ्रॉड अशी ही पाच युनिट राहणार आहेत.

हॅकिंग /डाटा चोरी : डाटा इनस्किप्ट, मेल हॅकिंग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर

ऑनलाइन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्स, फ्लिपकार्ट फ्रॉड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिंग मोबाइलर फार मनी ट्रान्सफर, ऑनलाइन सेल ॲन्ड परचेस फ्रॉड

चीटिंग फ्रॉड : आनलाइन डेटिंग साइट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, जॉब फ्रॉड, लोन फ्रॉड, पॅकेज टुर फ्रॉड, मोबाइल टॉवर फ्रॉड, मॅट्रिमोनियल फ्रॉड आदी.

सोशल नेटवर्किंग : फेसबुक, फेक डॉक्युमेंट, फेसबुब हॅकिंग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडीओ आदी.

एटीएम कार्ड फ्रॉड : मनी ट्रान्सफर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड फ्रॉड, ओटीपी शेअर फ्रॉड, मोबाइल, लॅपटॉप चोरी व इतर.

प्रशासन : पोलीस ठाण्याचे सर्व कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलीस ठाण्यांना तांत्रिक साहाय्य.

अशा प्रकाराची ही रचना असणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या दिवशी प्राप्त सायबर तक्रारी अर्जाचे युनिटप्रमाणे अधिकाऱ्यांना वाटप करतील. युनिटचे पोलीस निरीक्षक सायबर तक्रारी अर्जाचे पुढील कार्यवाहीकरिता व निर्गतीकरिता त्यांचेकडील सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची, तपासाबाबत, तसेच तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत, तक्रारीबाबत चौकशीनंतर व दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेक्षण करतील.

सायबर पोलीस ठाण्याकडील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अर्जातील फसवणुकीची रक्कम १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, सायबर तक्रारी अर्जास संदर्भात फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात असेल, तर ज्या सायबर तक्रारी अर्जामधील तक्रार ही डाटा चोरी, सोर्स कोड चोरी, वेबसाइट संदर्भातील तक्रारी अशा महत्त्वाच्या तक्रारी संदर्भात असेल, तर अशा तीन महत्त्वाच्या मुद्द्यावरील तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर, त्याबाबत संबंधित सायबर युनिटचे पोलीस निरीक्षक हे कार्यलयीन टिपप्णी ठेवून पोलीस उपायुक्त यांची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करतील, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.

(नोट- कृपया बातमी पुन्हा एकदा पाहून घेणे. वाक्यांची-शब्दांची लिंक नीट लागत नव्हती.)