शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; प्रशासनाने पुणेकरांना केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 23:34 IST

धरण साखळीत २५ टीएमसी पाणीसाठा : पुणेकरांची तहान भागली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून, धरणसाठादेखील वाढला आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरण साखळीत रविवारी (दि. २८) तब्बल २४.९५ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरली असून, धरणांतून विसर्ग केला जात आहे. खडकवासला धरण साखळीची पाणीसाठा क्षमता २९ टीएमसी आहे. आतापर्यंत २४.९५ टीएमसी साठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पण जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस झाला आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठा होऊ लागला. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत चांगला पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून पहिल्यांदाच रविवारी दुपारी १ वाजता ४,७१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

धरणांच्या परिसरात संततधार कायम असून, रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला. धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रशासनाने काय आवाहन केलंय?

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात  होणारा विसर्ग वाढवून आज रात्री १२.०० वा. १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये - उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग 

विसर्ग वाढवला !खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा ५१३६ क्युसेक विसर्ग वाढवून २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ७७०४ क्युसेक करण्यात आला. पानशेत धरणातूनदेखील रविवारी दुपारी ४७१२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला.

धरण साठा

खडकवासला : १.६१ टीएमसी : ८१.४३ टक्केपानशेत : १०.१६ टीमसी : ९५.४५ टक्के

वरसगाव : १०.२९ टीएमसी : ८०.२५ टक्केटेमघर : २.८९ टीएमसी : ७७.९९ टक्के

एकूण : २४.९५ टीएमसी : ८५.५९ टक्के

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस