शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

रासप, शेतकरी संघटना स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 23, 2015 23:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कृती समिती पाठोपाठ राष्ट्रीय समाजपक्षाने शेतकरी संघटनेसह छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

भवानीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कृती समिती पाठोपाठ राष्ट्रीय समाजपक्षाने शेतकरी संघटनेसह छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवानीमाता पॅनलची रविवारी घोषणा केली आहे. तर शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी देखील स्वबळावर लढणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर रासप, शेतकरी संघटनेने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने कारखान्याची तिहेरी लढत निश्चित झाली आहे.याबाबत रासपचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संपतराव टकले, जिल्हा उपाध्यक्ष बापूराव सोलनकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. विद्यमान संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचा उच्चांक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या सात वर्षात सत्ताधारी गटाने ‘होयबा’ चेअरमन दिले आहेत. पारंपारिक घराण्यांनाच पदे देण्यात सत्ताधारी मशगुल आहेत. कारखाना विस्तारवाढीला सभासदांनी परवानगी दिली असताना शेजारच्या खासगी साखर कारखान्यांचे हीत जोपासण्यासाठी संचालक मंडळ ठरावीक जणांनी चाकरी करीत आहेत. शेजारील कारखान्यांना ऊस देताना ऊस वाहतुकीपोटी २७ कोटी रुपयांचा तोटा ऊस उत्पादकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. बैठकीसाठी विष्णू चव्हाण, विजय थिटे, बापूराव सोलनकर, विनित पाटील, गिरीधर ठोंबरे, उमेश सपकळ, प्रकाश देवकाते, किशोर मासाळ, आण्णा पाटील, रमेश पाटील, नवनाथ मलगुंडे, अ‍ॅड. दिलीप धायगुडे, अ‍ॅड. गिरीष पाटील, रामदास अर्जुन आदी उपस्थित होते.