शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रसिका, स्वरूप प्रथम

By admin | Updated: January 25, 2017 01:31 IST

जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कुरण येथे पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणेच्या वतीने आयोजित ४२व्या जिल्हा

नारायणगाव : जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कुरण येथे पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणेच्या वतीने आयोजित ४२व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू (ता. शिरूर) येथील कु. रसिका शिवले हिचा प्राथमिक विभागात, तर कु. स्वरूप अतुल खारूळ, महात्मा गांधी विद्यालय सांगवी (पुणे) याचा माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक आला. दरम्यान, या प्रदर्शनाला पुणे जिल्ह्यातील ९० शाळांमधील २५,००० विद्यार्थ्यांनी भेट दिली.४२वे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात ‘मातृभाषेतून शिक्षण असावे का?’ याबाबत चर्चासत्र पार पडले. ज्यामध्ये प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्रा. नॅन्सी हंडा, रवींद्र भोर, राजश्री सदाकाळ, गझाला शेख व सुवर्णा वायकर हे सहभागी झाले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण जरूर घ्यावे; परंतु आजच्या विज्ञान युगाला सामोरे जाताना आंतरराष्ट्रीय भाषादेखील अवगत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी व्यक्त केले.या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ तहसीलदार आशा होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जयहिंदचे संस्थापक-अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांच्या अध्यक्षेखाली पार पडला. या वेळी उपशिक्षणाधिकारी बी. के. राक्षे, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, संचालक एन. एम. काळे, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे, प्राचार्य जाधवर, प्राचार्य वाय. एस. गुंजाळ, विस्तार अधिकारी बेंद्रे, आर. एस. शेंगाळ, के. बी. खोडदे, सुनंदा डुंबरे, अनिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. विस्तार अधिकारी अशोक लांडे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब खाडे व सुनीता वामन यांनी सूत्रसंचालन केले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे सर्व कर्मचारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)