जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST2021-08-18T04:13:56+5:302021-08-18T04:13:56+5:30

राजगुरूनगर: चास (ता. खेड) येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा ...

Rape of a minor girl by threatening to kill her | जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

राजगुरूनगर: चास (ता. खेड) येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गणेश वामन सपाट (वय ४४, रा. कमानची सपाटवाडी (ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान चास (ता.खेड) येथे हा प्रकार घडला. पीडित मुलीची आई घरात नसताना गणेश वामन सपाट हा घरात जाऊन पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार, त्याच्यार करत होता. तीन वेळा बळजबरीने शारीरिक संबध ठेवल्यामुळे पीडित मुलगी ही गरोदर राहिली. यानंतर आरोपी गणेश सपाट या विरुद्ध तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: Rape of a minor girl by threatening to kill her