महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:53 PM2021-01-12T17:53:01+5:302021-01-12T17:53:33+5:30

Neelam Gorhe : पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

Rajmata Jijau inspires all mothers to give Maharashtra the identity of a warlike state - Neelam Gorhe | महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा - नीलम गोऱ्हे

महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा - नीलम गोऱ्हे

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुणे : महाराष्ट्राची अस्मिता, क्षास्त्रतेज, देशाचे,राज्याचे रक्षण,स्वधर्माचे, रयतेचे रक्षण तसेच महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्यात त्याग करुन इतिहास घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ साहेबांनी केले. आजच्या या दिवशी महिलांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे व पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, कोथरूड विधानसभा समन्वयक सविता बलकवडे, कस्तुरी पाटील, शिरीष फडतरे, स्वाती धमाळे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे, शेलार गुरूजी, अनिता शिंदे, जयश्री सिरसाट, उपस्थित होते.

"महिला आणि समाजाच्या दृष्टीने स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणी स्वसंरक्षणासाठी महिलांना प्रशिक्षण सुरू केले आहे; त्यात आजतागायत दोन ते अडीच लाख महिला व मुलींन स्वसंरक्षणाचे धडे दिले आहे. तसेच, शिवसेना महिला आघाडीच्या आक्रमकतेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून शक्ती विधेयक येत असल्याने यातून बऱ्याच महिलांना न्याय मिळेल," असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Web Title: Rajmata Jijau inspires all mothers to give Maharashtra the identity of a warlike state - Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.