शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; भातपेरण्या संकटात

By admin | Updated: June 12, 2014 05:29 IST

भातपीक पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागलीच नाही. मृग नक्षत्र कोरडे जाऊ लागले आहे. धूळवाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या भातपेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डिंभे : भातपीक पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागलीच नाही. मृग नक्षत्र कोरडे जाऊ लागले आहे. धूळवाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या भातपेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसागणिक भातपेरण्या लांबत चालल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या सुमारे ६४,६०० हेक्टरभात भातक्षेत्राला यंदा मृगनक्षत्रातही भातपेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागातील विशेषकरून सह्याद्रीच्या पर्वतरांगातील आदिवासी शेतकऱ्यांकडून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. पुणे जिल्ह्यात अनुक्रमे आंबेगाव तालुका-५५०० हेक्टर, जुन्नर-९३००, मावळ-९७००, भोर-७५००, वेल्हा-६०००, हवेली-२८००, खेड-६७००, मुळशी-१५७०० व पुरंदर-१४०० हेक्टर एवढे भातक्षेत्र आहे. भातपिकाच्या तयारीसाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनी भाजणीपासून पेरणी, लागवडी ते भातपीक काढणीपर्यंत विविध कामे करावी लागतात. भातशेतीसाठी या पिकाची पेरणी व लागवड वेळेत झाल्या, तरच या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आसते.दर वर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रातच पाऊस पडेल, या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली. यंदा भातपीक चांगले येणार, असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेलच, या आशेवर जुनेजाणते शेतकरी भातपिकाच्या पेरण्या करताना पाहावयास मिळतात. यंदाही जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, भोर, मुळशीतील काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर भातपरण्या केल्या आहेत. परंतु, रोहिणी पूर्ण कोरडेच गेल्याने धूळवाफेवर टाकलेली रोपे पिठळून या पेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)