अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST2021-09-26T04:12:07+5:302021-09-26T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अतिक्रमण विरोधी कारवाई करीत असताना महापालिकेच्या सहायक अतिक्रमण निरीक्षक महिलेला शिवीगाळ करून राडा ...

Pushback to officers in encroachment action | अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अतिक्रमण विरोधी कारवाई करीत असताना महापालिकेच्या सहायक अतिक्रमण निरीक्षक महिलेला शिवीगाळ करून राडा घालणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

आकाश भगवान दुधाळे (वय २४, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) आणि साहील अनिल शेलार (१८, रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मेघा राऊत (३३, रा. घोरपडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या महापालिकेत सहायक अतिक्रमण निरीक्षक म्हणून नोकरीस आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात त्यांची नेमणूक आहे. शुक्रवारी सकाळी शिवनेरी रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई करीत असताना आकाश याने कर्मचाऱ्याला ‘तुला बघून घेतो,’ अशी धमकी देत फिर्यादी यांना ‘तुम्ही गरिबावर अन्याय करता. हप्ते घेता अन् कष्ट करून खाणाऱ्यांना त्रास देता,’ असे म्हणत शिवीगाळ केली, असा आरोप आहे.

Web Title: Pushback to officers in encroachment action