शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या वृत्तीची पाठराखण आढळरावांना महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : चुकीच्या वृत्तीने वागणाऱ्या भगवान पोखरकरसारख्या लोकांची पाठराखण करण्याचे काम खेड तालुक्यात माजी खासदारांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : चुकीच्या वृत्तीने वागणाऱ्या भगवान पोखरकरसारख्या लोकांची पाठराखण करण्याचे काम खेड तालुक्यात माजी खासदारांनी कायम केले. भांडणे लावणाऱ्या आढळरावांना तालुका पुन्हा स्वीकारणार नाही. तसेच सभापती भगवान पोखरकर राजकारणातून कायमचे संपले, अशी कडवट टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कँाग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनतर झालेल्या स्वागत सभेत मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अरुण चांभारे, शांताराम सोनवणे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती रामदास ठाकूर, सुरेश शिंदे, कैलास सांडभोर, राजाराम लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर, माजी सभापती अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, मयूर मोहिते, विलास मांजरे, सुभाष होले, यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर सदस्य यावेळी उपस्थित होते.

मोहित पाटील म्हणाले, महाआघाडीचे सरकार राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असताना तालुक्यात झालेला बदल आढळराव यांनी वरिष्ठांना चुकीच्या पद्धतीने सांगितला. खरी वस्तुस्थिती लपवली. त्यामुळे गेले तीन महिने सर्व तालुक्याला त्रास झाला. नागरिकांची कामे रखडली. विकास कामांना खीळ बसली. पंचायत समितीच्या सेना सदस्यांना विश्वासात न घेता वादग्रस्त व्यक्तीची पाठराखण करून वाद लावले. पोखरकर हा गुन्हेगार आहे. पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर असताना त्या हॉटेलवर पोखरकरने जाऊन राडा केला. हवेत गोळीबार केला. कोयते दाखवून दहशत निर्माण केली. महिला सदस्यांना मारहाण केली. पोखरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलाकडून माझा खून घडवून आणण्याचा कट रचला. यांचे पुरावे माझ्या हाती लागले आहे. माजी खासदार या गोष्टींना खतपाणी घालत आहे. आढळराव हे खेड तालुक्याच्या जीवावर तीन वेळा निवडून आले. मात्र, विकास काय केला हे त्यांनी जनतेला सांगावे. आमच्या मदतीने शिवसेनेचे पोखरकर यांनी पद मिळवले. त्याला आमदार मोहिते पाटील यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यायला पोखरकर यांनी नकार दिल्याने पुढील घटना घडल्या, असे सभापती अरुण चौधरी म्हणाले.