शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाण्याचा झाला खेळखंडोबा

By admin | Updated: September 6, 2014 00:00 IST

शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे.

पुणो : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. परंतु, पुढील वर्षभर शहराला सुरळित पाणी पुरवठा होण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम आहे. गेल्या तीन महिन्यांत एक दिवसा आड, दोनवेळा आणि एकवेळा असे वारंवार पाणी पुरवठय़ाचे  निर्णय़ बदलण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा नियोजन व यंत्रणोचा खेळखंडोबा होणार आहे. 
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणात 1क्क् टक्के साठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मग, पुणोकरांना एकवेळ पाणी पुरवठा का ? असा सवाल शहरातील राजकीय पक्ष व  स्वयंसेवी संस्थानी उपस्थित केला आहे. धरणो भरल्यामुळे दोन वेळ पाणी देण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. मात्र, वारंवार पाणी पुरवठय़ाच्या नियोजनात बदल करणो अशक्य आहे.  
दरवर्षी धरणो 1क्क् टक्के भरूनही मार्च महिन्यांत पाणी कपात करावी लागते. त्यामुळे महापालिकेने यंदापासून 31 जुलैऐवजी ऑगस्ट अखेर्पयत राखीव साठा ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणी टंचाई व कपात टाळता येईल. त्यादृष्टीने वर्षेभर एकवेळ व पुरेसा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे.(प्रतिनिधी)
 
पुरवठय़ाचा लंपडाव 
प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या धरसोड वृत्तीमुळे  एकवेळ आणि दोनवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याने वितरण व्यवस्था वारंवार विस्कळीत होत आहे. धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्याने जून महिन्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाऊस आणखीनच लांबल्याने जुलैच्या दुस-या आठवडयात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा 25 जुलै रोजी एकवेळ पाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दोन वेळा पाणी सुरू करण्यात आले. तर पुन्हा 14 ऑगस्टला एक वेळ पाण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार वितरण व्यवस्थेत बदल केल्याने पाणी पुरवठा यंत्रणोचा बिघाड होत असून, त्याचा त्रस सर्वसामान्यांना पुणोकरांना सहन करावा लागत आहे.
पुणोकरांचे पाणी आंध्राला कशाला 
शहराला पाणी पुरवठा करणारी धरणो 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे यापुढे या धरणांमध्ये पडणारा प्रत्येक थेंब नदीत व कालव्यात सोडून ध्यावा लागणार आहे. पुढचे उजनी धरण ही 1क्क् } भरले आहे त्यामुळे नदीत सोडलेले पाणी उजनी मध्ये ही साठवता येणार नाही व ते तेथून आंध्र मध्ये सोडावे लागणार आहे. म्हणजे पानशेत, खडकवासला धरणांचे पाणी थेट आंध्रप्रदेशला जाणार आहे. दुसरीकडे कालव्यातून पुणो जिल्हसाठी पाणी सोडणो सुरूच आहे, आणि पावसाळा संपेपयर्ंत ते सुरूच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जादा पाणी पुणोकरांना देऊन एकवेळ पाण्याची कपात मागे घ्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. तसेच  आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हा निर्णय तत्काळ घ्यावा अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थाच्या मागणीनुसार आयुक्तांनी बैठक बोलाविली होती. त्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 
- व्ही.जी कुलकर्णी, 
पाणीपुरवठा विभाग प्रमुख