Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:51 IST2026-02-06T15:51:31+5:302026-02-06T15:51:44+5:30

दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात असताना एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली

Puneaccident Biker dies on the spot after being hit by speeding truck Shocking incident in Hadapsar area | Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये काल दुपारी पावणे बारा वाजता एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझम खान (वय ३८, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून,गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हांडेवाडी चौकाजवळ एका हॉटेलसमोर काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title : पुणे: तेज़ रफ्तार ट्रक की टक्कर से बाइक सवार की मौके पर ही मौत

Web Summary : पुणे के हडपसर में तेज़ रफ्तार ट्रक ने बाइक को टक्कर मारी, जिससे 38 वर्षीय आज़म खान की मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच कर रही है।

Web Title : Pune: Biker Dies Instantly After Being Hit by Speeding Truck

Web Summary : A 38-year-old biker, Azam Khan, died in Hadapsar, Pune, after a speeding truck hit his vehicle near Handewadi Chowk. Police have arrested the truck driver and are investigating the case.