Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात २४ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; पुरंदर तालुक्यात 'या' गटाने उघडले विजयी खाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:46 IST2026-02-09T11:36:36+5:302026-02-09T11:46:24+5:30
Pune ZP Election Result 2026 पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १६ शिवसेना ४ ठाकरे सेना आणि काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात २४ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; पुरंदर तालुक्यात 'या' गटाने उघडले विजयी खाते
पुणे : पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाच्या निकालाला आज सकाळापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. यंदा सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले. आता समोर आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप १५ शिवसेना ३ ठाकरे सेना आणि काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे.
१३ पंचायत समितीमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने खाते उघडले असून दिवे --गराडे गटातून विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या रूपाली झेंडे, अर्चना कटके, अमित झेंडे हे विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत एकूण मतदानांपैकी १० लाख ७६ हजार ५९८ पुरुष मतदारांनी मतदान केले, तर ९ लाख ५८ हजार १४४ महिला मतदारांनी मतदान केले. २०१७ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यात ७१.३५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १६.४५ टक्के इतकी घट झाली आहे.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
जुन्नर – ६१.१८
आंबेगाव – ६५.३०
शिरूर – ७५.५९
खेड – ७५.४६
मावळ – ७७.४३
मुळशी – ६३.७९
हवेली – ६८.०२
दौंड – ६५.००
पुरंदर – ६८.३७
राजगड (वेल्हा) – ७९.३०
भोर – ७५.६२
बारामती – ५४.९०
इंदापूर – ६५.६७