Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:18 IST2026-02-09T15:15:42+5:302026-02-09T15:18:20+5:30

Pune ZP Election Result 2026 पुणे जिल्ह्यात ७३ जागांपैकी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे

Pune ZP Election Result 2026 In Pune, except for NCP, no other party could reach double figures and Congress got a landslide victory. | Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा

Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा

पुणे : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादांचे स्वप्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ७३ जागांपैकी तब्बल ४८ जागांवर विजय मिळवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर इतर पक्षांनी एक आकडी जागेवर आहेत. काँग्रेस तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागा मिळवण्यात अपयशी ठरले असून त्यांना भोपळ्यावर समाधान मानावे लागले आहे. 

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुण्यात एकहाती सत्ता मिळवण्याचे अजित पवारांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. भाजपला १० जागेवर समाधान मिळवावे लागले आहे. शिवसेना ४ उद्धवसेना ६ आणि शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे.  २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात ७५ गटांपैकी ४४ गटांत विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते. मात्र यंदाही पुन्हा पुण्यात घड्याळच दिसत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वधिक आमदार आहेत. त्यांचा फायदा या जिल्हा प्रदशड निवडणुकीत झाल्याचे दिसून आले आहे. मावळ भागातही राष्ट्रवादीने भाजपच्या जागा खेचून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यात अजितदादांनी अनेक विकासकामे केली होती. त्यामुळे मतदारांनी घड्याळाला साथ देत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून दिली आहे.   

पुणे जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी

१ ) जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)

ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)

सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

२ ) आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

३ ) शिरूर

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार

४ ) खेड

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )

पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

५ ) मावळ

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

६ ) मुळशी

पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)

७ ) हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

८ ) दौंड

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड : गायत्री खळदकर

बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी)

९ ) पुरंदरे

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

१० ) वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

११ ) भोर

कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

१२ ) बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

१३ इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)

Web Title : पुणे जिला परिषद चुनाव: एनसीपी का दबदबा, कांग्रेस को नहीं मिली कोई सीट

Web Summary : पुणे जिला परिषद चुनावों में, एनसीपी ने 43 सीटों के साथ शानदार जीत हासिल की। अन्य पार्टियां संघर्ष करती रहीं, भाजपा को 8 सीटें मिलीं। कांग्रेस कोई भी सीट जीतने में विफल रही। अजित पवार का सपना साकार।

Web Title : Pune ZP Election: NCP Dominates, Congress Fails to Secure Any Seats

Web Summary : In Pune ZP elections, NCP secured a landslide victory with 43 seats. Other parties struggled, with BJP getting 8. Congress failed to win any seats. Ajit Pawar's vision succeeds.