Pune ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात अनेक वर्षे काँग्रेस; यंदा मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली, १ जागेवर भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:04 IST2026-02-09T18:03:03+5:302026-02-09T18:04:12+5:30

Pune ZP Election Result 2026 राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आली असून दोन्ही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तर चार गणपैकी एका जागेवर भाजप आले आहे

Pune ZP Election Result 2026 Congress ruled Rajgad taluka for many years this year, however, NCP single-handedly brought it to power, BJP in 1 seat | Pune ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात अनेक वर्षे काँग्रेस; यंदा मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली, १ जागेवर भाजप

Pune ZP Election Result 2026: राजगड तालुक्यात अनेक वर्षे काँग्रेस; यंदा मात्र राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली, १ जागेवर भाजप

राजगड: राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता आली असून दोन्ही जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी तर चार गणपैकी एका जागेवर भाजप आले आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी राजगडचा गड राखला असून विधानसभेप्रमाणे पंचायत समितीचे अनेक वर्षापासून असलेली एक हाती सत्ता खेचून आणली. गेल्या अनेक वर्षांपासून वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले अचानक निधन आणि आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या विकासासाठी भरघोस निधी या जोरावर राष्ट्रवादीची सत्ता आल्याची तालुक्यात चर्चा सुरू होती.

वेल्हे गटामध्ये सर्वात चुरस पहायला मिळाली भाजपचे शिवाजी चोरघे यांनी कडवी झुंज दिली. परंतु राष्ट्रवादीच्या तानाजी मांगडे 797 मतांनी विजयी झाले आहे. तर जिल्हा परिषद विंझर गटात राष्ट्रवादीचे अमोल नलावडे हे 1602 मतांनी विजयी झाले आहे. तसेच वेल्हे गणात राष्ट्रवादीच्या सीता नंदकुमार खुळे ह्या 2523 मतांनी विजयी झाल्या आहेत. वांगणी गणात राष्ट्रवादीचे संदीप लहू खुटवड हे 463 मतांनी विजयी झाले.तर पानशेत गणात  राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष किरण राऊत यांच्या पत्नी सुवर्णा राऊत ह्या 1535 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर विंझर गणात भाजप चे गणेश नामदेव जागडे  हे 1404 मतांनी विजयी झाले आहे

राजगड तालुका निकाल 

वेल्हे - जिल्हा परिषद गट
1) तानाजी दगडू मांगडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी 10262 मते 
2) शिवाजी चोरघे (भाजपा) 9712
3) शैलेश वालगुडे (शिवसेना उबाठा ) 880 
4) गोरक्षनाथ शंकर भुरुक (अपक्ष) 829 

वेल्हे गण 

1) सीता नंदकुमार खुळे ( राष्ट्रवादी काँग्रेस)  विजयी 5858 मते 
2) निकिता निलेश पवार (भाजप) 3486 मते 
3) सुवर्णा हेमंत राजीवडे (अपक्ष) 338

वांगणी गण 

1)  संदीप लहू खुटवड (राष्ट्रवादी काँग्रेस)  विजयी 4038 मते 
2) विशाल मारुती वालगुडे (भाजप) 3572 मते
3) विजय चोरघे (शिवसेना उबाठा) 2635 मते 
4) दिलीप विठ्ठल रणखांबे (वंचित बहुजन आघाडी) 141 मते 
5) हनुमंत कार्ले (अपक्ष) 1386 मते 
6) दिगंबर शिळीमकर (काँग्रेस) 61) 

विंझर गट - जिल्हा परिषद

1) अमोल उल्हास नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस) 8678
2) अनंता रेवननाथ दारवटकर (शिवसेना शिंदे गट) 5849 मते 
3) शिवराज शेंडकर (भाजपा) 7076 मते 
4) अक्षय मरळ (काँग्रेस) 251

विंझर गण 

1) गणेश नामदेव जागडे (भाजपा)  मते 5032 मते विजयी
2) अंकुश दसवडकर (राष्ट्रवादी काँग्रेस). 3328 मते  
3) दिलीप रेणुसे (शिवसेना शिंदे गट). 2371 मते 
4) प्रदीप कांबळे (वंचित आघाडी).    142 मते 
5) शंकर नलावडे 216 मते 

पानशेत गण

1) - सुवर्णा किरण राऊत (विजयी) राष्ट्रवादी काँग्रेस 4523 
2) सीमा विष्णू राऊत (भाजप) 3383
3) स्नेहल ढेबे (शिवसेना शिंदे गट) 558
4) प्रतीक्षा जगताप (शिवसेना उबाठा) 322
5) उज्वल पासलकर (काँग्रेस) 277 
6) आशा अंकुश पासलकर (अपक्ष ) 1333

Web Title : राजगढ़ जेडपी चुनाव: राकांपा की जीत, भाजपा ने एक सीट जीती।

Web Summary : राजगढ़ जेडपी चुनाव में राकांपा का दबदबा, कई वर्षों बाद कांग्रेस से सत्ता छीनी। राकांपा ने दोनों जेडपी सीटें जीतीं, भाजपा ने एक सीट हासिल की। अजित पवार के प्रभाव और विधायक मांडेकर के विकास कोष ने राकांपा की सफलता को बढ़ावा दिया।

Web Title : Rajgad ZP Election: NCP Secures Victory, BJP Wins One Seat.

Web Summary : NCP dominates Rajgad ZP elections, seizing power from Congress after many years. NCP won both ZP seats, BJP secured one. Ajit Pawar's influence and MLA Mandekar's development funds fueled NCP's success.