पुणे: महावितरणने पुढील पाच वर्षांत वीजदर कपातीसाठी केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय जाहीर केला असून, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. त्यानुसार हे वीजदर सरासरी तीस पैशांनी कमी करून पुणे परिमंडळातील ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात सुखद दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे परिमंडळातील ३८ लाख ७१ हजार ग्राहकांची महिन्याला सुमारे १० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
राज्य सरकारने गुरुवारी वीजदर कमी करण्याचे घोषणा केली होती. यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषिपंपधारक ग्राहकांना फायदा होणार आहे. याबाबत महावितरणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सौर ऊर्जेचे उत्पादन वाढल्याचा हा परिणाम आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबविली. यातून ४ हजार मेगावॉट वीज दिली जाते. तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप योजना राबविली. शेतकरी दिवसा सौर ऊर्जेचा वापर सिंचनासाठी करीत आहेत. त्यामुळे या योजनेचा भार इतर ग्राहकांवर पडत नाही. त्यामुळे विजेचे दर सरकारला कमी करता आले.
युनिट---जुना दर --- कमी झालेले दर---एवढे पैसे झाले कमी
० ते १०० ---४.२८---- ३.९६---३२१०१ ते ३०० ---११.१०--- १०.८०---३०३०१ ते ५००--- १५.३८--- १५.०२---३५५०१ ते १००० ---१७.६८--- १७.५३---१५
वहन आकारात १३ पैशांनी वाढ
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे दर कमी करून दिलासा दिला आहे. असे असले तरी वहन आकारामध्ये मात्र, १३ पैशांनी वाढ केली आहे. ती अशी विजेच्या बिलामध्ये वहन आकार १ रुपया ४७ पैसे आहे. १ एप्रिलपासून त्यामध्ये वाढ करून ते १ रुपया ६० पैसे करण्यात आला आहे. म्हणजेच वहन आकारात १३ पैशांनी वाढ केली आहे.
वीजदर कमी होण्याची कारणे
- वीज कंपन्यांनी (महावितरण, टाटा पॉवर, अदानी) दर कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केला.- वीज कंपन्यांचा खर्च कमी झाला. वीज तयार करण्यासाठी लागणारा खर्च (कोळसा, इंधन, उत्पादन खर्च) काही प्रमाणात कमी झाला आहे.- पुणे शहर, आंबेगाव, राजगुरूगगर, हवेली या परिमंडळात ३८ लाख ७१ हजार ग्राहक- घरगुती ग्राहक ३३ लाख ८७ हजार- औद्योगिक ग्राहक - ५७ हजार ५६०- वाणिज्यिक ग्राहक- ३ लाख ९५ हजार ५१९- कृषिपंप ग्राहक - १ लाख १ हजार ३६८
Web Summary : Pune residents will see lower electricity bills starting April 1st, with an average reduction of 30 paise per unit. This benefits all consumer categories and saves Pune division consumers around ₹10 crore monthly due to increased solar energy production and government initiatives.
Web Summary : पुणे के निवासियों को 1 अप्रैल से बिजली बिलों में राहत मिलेगी, प्रति यूनिट औसतन 30 पैसे की कमी होगी। इससे सभी उपभोक्ता श्रेणियों को लाभ होगा और सौर ऊर्जा उत्पादन और सरकारी पहलों में वृद्धि के कारण पुणे मंडल के उपभोक्ताओं को लगभग ₹10 करोड़ मासिक की बचत होगी।