Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:41 IST2025-05-21T10:41:23+5:302025-05-21T10:41:38+5:30

पावसामुळे झालेल्या झाडपडी, भिंत कोसळण्याच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीववित्तहानी झाली नाही

Pune Rain: Rain wreaks havoc in the city; Strong winds cause tree fall in 15 places | Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे : पूर्व मोसमी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असल्याचे चित्र मंगळवारी शहरात दिसून आले. पाऊस आणि सुसाट वाऱ्यामुळे शहराच्या विविध भागात १५ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच धनकवडी येथील तीन हत्ती चौकाजवळ एक सीमा भिंत कोसळली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले.

शहर व परिसरात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस आणि वाऱ्यामुळे येरवडा, कोरेगाव पार्क, एरंडवणा, धानोरी, टिंगरेनगर, देवाची ऊरुळी, बावधन, मुकुंदनगर, काळेपडल, काळेबोराटे नगर, हडपसर, फातिमानगर आदी ठिकाणी १५ झाडपडीच्या घटना घडल्या. तसेच धनकवडी येथील तीन हत्ती चौक येथे एक सीमा भिंत पडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या संदर्भात नागरिकांकडून माहिती मिळाल्याबरोबर अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जावून मदतकार्य हाती घेऊन वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले.

पद्मावतीनगर सोसायटीत भिंत कोसळली

तीन हत्ती चौक येथील पद्मावतीनगर सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळे एक रिटेनिंग वॉल कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश गांधी म्हणाले, रिटेनिंग वॉलचे बांधकाम कमकुवत झाले असल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यांनी यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेबाबत माजी नगरसेवक महेश वाबळे यांनी माहिती देताना सांगितले, भिंत कोसळल्यामुळे काही पत्र्याच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. मात्र, वेळेवर विद्युत विभागाशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे त्वरित दुरुस्ती व सुरक्षेची मागणी केली आहे.

Web Title: Pune Rain: Rain wreaks havoc in the city; Strong winds cause tree fall in 15 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.