पुणे : शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ आणि दाणादाण उडाली. शहराच्या विविध भागात पाणी शिरण्यासह झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच शहरातील रस्ते जलमय झाले असतानाच अनेक ठिकाणचे चेंबर आणि पावसाळी लाईन तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाली होती.
दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब (EHV) व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड (Tripping) झाल्याने पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. साधारणत: तासभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहिन्यांवर झाडे पडली होती. तर काही ठिकाणी फिडर बॉक्स पाण्यात गेल्यामुळे वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या. तर विजेच्या कडकडाटांमुळे ही काही ठिकाणी वीज वाहिन्या बाधित झाल्या होत्या. काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
कोथरुड भागात कुंदनगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकावर करणारी यंत्रणा बाधित झाली. त्यामुळे संबंधित वाहिनीचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र पर्यायी मार्गाने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आता केवळ २ रोहित्र बंद आहेत. नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्यामुळे अर्ध्यातासासाठी कोथरुड विभागातील वीजपुरवठा बाधित झाला होता. पाऊस थांबताच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
शिवाजीनगर विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर, शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला असून विद्यापीठ वाहिनी सुरु करण्यात यश मिळाले.
पिंपरी/भोसरी या भागातील रावेत २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला असून, यावरील ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. त्याला पर्यायी मार्गाने सुरु करण्याचे प्रयत्न महावितरण कर्मचारी करीत आहेत.
पर्वती या भागातील महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले होते. त्याला हटवून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. तर प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फिडर बॉक्स भागात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. खडकवासला, श्रवण वाहिनीच्या पेट्रोलिंगचे काम हाती घेतली असून, बिघाड सापडताच दुरुस्ती केली जाणार आहे.
बंडगार्डन या विभागात वडाचीवाडी या उपरी वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. तर वाडिया वाहिनीला तासाभरातच पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले आहे.
रास्तापेठ विभागातील कोंढवा, येवलेवाडी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवर परिणाम झाल्याने या भागातील वीजपुरवठा देखील बाधित झालेला आहे.
विजेच्या तक्रारींसाठी टोल फ्रीचा वापर करावा - महावितरण
वीजग्राहकांनी विजेसंबंधिच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. तसेच 9167777791 या क्रमांकाला व्हॉट्सॲपद्वारे Hi करुन देखील तक्रार करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध आहे.
Web Summary : Unseasonal rains lashed Pune, disrupting life. Traffic snarled, power failed in many areas due to damaged lines and fallen trees. MSEDCL is working to restore power; citizens can report issues via toll-free numbers.
Web Summary : पुणे में बेमौसम बारिश से जीवन अस्त-व्यस्त हो गया। क्षतिग्रस्त लाइनों और गिरे हुए पेड़ों के कारण कई क्षेत्रों में यातायात बाधित, बिजली गुल। MSEDCL बिजली बहाल करने के लिए काम कर रहा है; नागरिक टोल-फ्री नंबरों के माध्यम से समस्याओं की रिपोर्ट कर सकते हैं।