Pune: ‘प्रताप हिची मस्ती जिरव’, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अत्याचार करणाऱ्या पती-पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:01 IST2026-02-16T12:00:39+5:302026-02-16T12:01:15+5:30

फिर्यादी महिलेने तिच्या मैत्रिणीकडून व्याजाने पैसे घेतले होते, ते परत केले असतानाही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेवर अत्याचार केला

Pune: 'Pratap's fun is a joke', threatening to make obscene video viral; Torturing couple arrested | Pune: ‘प्रताप हिची मस्ती जिरव’, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अत्याचार करणाऱ्या पती-पत्नीला अटक

Pune: ‘प्रताप हिची मस्ती जिरव’, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; अत्याचार करणाऱ्या पती-पत्नीला अटक

पुणे: व्याजाने घेतलेले पैसे परत केले असतानाही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेवर अत्याचार केला. पत्नीच्या मदतीने तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

प्रताप रमेश जाधव (४५) आणि त्याची पत्नी पल्लवी दादासो कारंडे/ पल्लवी प्रताप जाधव (२८, दोघे रा. भिंताडेनगर, सिंहगड कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी या पती पत्नी व एका वकिलासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पल्लवी जाधव या मैत्रिणी आहेत. फिर्यादी यांनी प्रताप जाधव याच्याकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी ते पैसे परत केले होते. असे असताना त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने प्रताप जाधव याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केले. त्याची तक्रार देण्यासाठी त्या पोलिसांकडे जात असताना प्रताप व पल्लवी यांनी पुन्हा फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना पूर्ण पैसे दिले आहेत, आता आणखी देऊ शकत नाही, असे म्हणाली. तेव्हा पल्लवी हिने प्रताप याला ‘प्रताप हिची मस्ती जिरव’ असे म्हणाली. तेव्हा पल्लवी घरात असताना प्रताप याने फिर्यादी हिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ व फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रताप, पल्लवी व इतरांनी उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास फिर्यादीला २० ते २५ लाख रुपये व एक फ्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी तसे करण्यास नकार दिल्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: कर्ज के लिए यौन उत्पीड़न, वीडियो धमकी; दंपत्ति गिरफ्तार

Web Summary : पुणे: कर्ज चुकाने के बाद भी एक महिला पर यौन उत्पीड़न करने के आरोप में एक दंपत्ति को गिरफ्तार किया गया। उन्होंने अश्लील वीडियो जारी करने और झूठे आरोप लगाने की धमकी दी। पत्नी की मदद से पति ने पीड़िता पर हमला किया।

Web Title : Pune: Couple Arrested for Sexual Assault, Video Threat Over Debt

Web Summary : Pune: A couple was arrested for sexually assaulting a woman despite debt repayment. They threatened to release explicit videos and file false charges. The husband assaulted the victim, aided by his wife, after she refused further payments.