युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:19 IST2025-05-10T10:18:55+5:302025-05-10T10:19:05+5:30

युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते

Pune police focus on social media in wake of war; Woman arrested for posting 'Pakistan Zindabad' | युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक

युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक

पुणे : कोंढव्यात राहणाऱ्या एका युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब येताच, कोंढवापोलिसांनी संबंधित युवतीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. खतिजा शहाबुद्दीन शेख (१९, रा. कौसरबाग, ईशा लरीयल, कोंढवा) असे युवतीचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्याचे हवालदार सुभाष जरांडे (४३) यांनी फिर्याद दिली आहे. सुभाष जरांडे हे शुक्रवारी (दि. ९) कोंढवा पोलिस ठाण्यात ड्युटीवर असताना ते दुपारी १:०० ते २:००च्या दरम्यान सोशल मीडियावर युद्धाच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपवर खतिजा शेख हिने सोशल मीडियावर भला मोठा मेसेज करत शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान भारत पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यही अलर्ट मोडवर आले आहे. गृहमंत्रालयाकडून पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच पोलिसांनी समाजमाध्यमांवर आता लक्ष वेधले आहे. त्यावरून कोणत्याही प्रकारचे मेसेज व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्तीला थेट ताब्यात घेतले जात आहे.    

Web Title: Pune police focus on social media in wake of war; Woman arrested for posting 'Pakistan Zindabad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.