शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 18:47 IST

या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे

पुणे : शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन धडक कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी) तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

खराडी पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ३ फेब्रुवारी रोजी खराडी येथील सार्वजनिक रस्त्यावर एका कारमध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या झडती दरम्यान २७ ग्रॅम एमडी त्यांच्याजवळ आढळून आले. त्यानंतर दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (२८, रा. वाघोली) आणि हरिष सुजना रामदेवासी (२२, रा. वाघोली) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एमडीसह १२ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. हे दोघे गिफ्ट शॉप चालवत असून मूळचे राजस्थानातील जोधपूरचे रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले. गेल्या वर्षभरापासून ते अंमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले.तपासादरम्यान योगेश ऊर्फ मनीष बाबुराम बिष्णोई (३०) हा राजस्थानहून एमडी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून १५१ ग्रॅम एमडी आणि ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. चौकशीत त्याचा मावस भाऊ सचिन ऊर्फ एस.के. रमेशकुमार बिष्णोई (२०) हा देखील व्यवहारात सहभागी असल्याचे समोर आले. त्याला हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एमडी विक्रीतून मिळालेले ४ लाख ६५ हजार रुपये जप्त करण्यात आले.

या साखळीत पुढे अमित सुनील घुले (४०, रा. मांजरी) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून ३९८ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल आणि एकूण १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकरणाचा गांभीर्याने आढावा घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील व पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी राजस्थानमधील मुख्य वितरकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड, उपनिरीक्षक राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड असे एकूण ५ अधिकारी व २० अंमलदार यांचे वेगवेगळी ५ पथके तयार करुन त्यांना ९ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथे पोहचले.

राजस्थानमध्ये तपास करताना रतनलाल किष्णाराम जाठ (२०, रा. बलदेवनगर, बालोतरा) याला ११ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचे १ हजार ३८४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच पुण्यातून फरार असलेला आणि या रॅकेटमध्ये सक्रिय असलेला रामकरण जाट ऊर्फ चौधरी ऊर्फ सियाग (रा. कपोरिया ओसीया, जोधपूर) याला १२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

आरोपींकडून एकूण १ हजार ९६० ग्रॅम एमडी, ३ कोटी ९२ लाख रुपयांचा अमली पदार्थ, तसेच ३५ लाख ९ हजार रुपयांचे मोबाईल, फॉर्च्यूनर गाडी आणि अन्य साहित्य असा एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत पोलिस अंमलदार श्रीकांत शेडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, निलम कर्पे, अंकुश जोगदंड, लालु कर्हे, राहुल जोशी, अमोल सोनवणे, संदीप जाधव, तांत्रिक विश्लेषक प्रविण गव्हाणे हे देखील सहभागी होते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Bust Rajasthan Drug Racket, Seize Crores Worth MD

Web Summary : Pune police in Rajasthan busted an international MD smuggling racket, seizing ₹4.27 crore worth of drugs. Six arrests were made in Pune and Rajasthan, revealing a network involving gift shop owners and suppliers. The operation uncovered a large MD stash and disrupted a significant drug trafficking chain.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रDrugsअमली पदार्थRajasthanराजस्थानMONEYपैसा