शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

धरणसाठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ : जिल्ह्यातील धरणांची क्षमताच केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:06 PM

गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ राज्यातील बहुतांश धरणांना झाली तीस ते चाळीस वर्षांची

विशाल शिर्के- पुणे : राज्यातील बहुतांश धरणांना तीस ते चाळीस वर्षे झाली असून, काही धरणे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. वर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील या धरणांमध्ये गाळ साचत आहे. काही संघटनांनी आंदोलने करूनही रुतलेला गाळ काही जागचा हलला नाही. आता, गाळाने धरण भरत असल्याने त्याची क्षमताच कमी करण्याचा निर्णय काही धुरिणांनी घेतला आहे. गाळ काढण्यासाठी फारसे प्रयत्न न करता राबविण्यात आलेला हा 'पुणे पॅटर्न ' राज्याला जलसंकटात लोटू शकतो. नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) धरणाच्या अभियांत्रिकीबरोबरच धरणातील साठलेल्या गाळावरदेखील अभ्यास करते. या संस्थेने घोड पाटबंधारे उपविभागातील घोड प्रकल्पाच्या जलाशयाच्या साठवण क्षमतेचा अभ्यास केला. त्यात त्यांना गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाल्याचे आढळले. घोड धरणाची एकूण साठ्याची प्रकल्पीय क्षमता ७.७३ अब्ज घनफूट (टीएमसी) होती. गाळामुळे त्यात ४.८७ अब्ज घनफुटापर्यंत घट झाली आहे. म्हणजेच तब्बल १.७० टीएमसीने पाणीसाठा घटला आहे. दुसºया शब्दात सांगायचे झाल्यास पुणे शहराची ३५ ते ४० दिवसांची तहान भागेल इतके पाणी धरणातील गाळामुळे कमी झाले आहे. याचाच अर्थ, जवळपास एक खडकवासला (उपयुक्त साठा १.९७ टीएमसी) धरणाइतकी क्षमता कमी झाली आहे.  हा अहवाल आल्यानंतर घोड पाटबंधारे विभागाने धरणसाठ्याच्या आकडेवारीतच बदल केला आहे. भीमा खोरे पाटबंधारे अहवालात २१ नोव्हेंबर २०१९ पूर्वी या धरणाची प्रकल्पीय पाणीसाठ्याची क्षमता ७.६३ टीएमसी होती. ती २१ नोव्हेंबरपासून ५.९७ टीएमसी करण्यात आली आहे. तसेच पूर्वीचा उपयुक्त पाणीसाठादेखील ५.४६ टीएमसीवरून ४.८७ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. त्यातही ०.५९ टीएमसीने घट झाली आहे. या बाबत बोलताना जलतज्ज्ञ डॉ. डी. बी. मोरे म्हणाले, राज्यात सह्याद्रीच्या दºयाखोºयात आणि मैदानी भागात धरणे आहेत. डोंगराळ भागातील धरणांच्या क्षेत्रात तुलनेने अधिक झाडी-झुडपे असल्याने कमी गाळ धरणात येतो. त्या तुलनेत मैदानी भागातील धरणांमधे गाळ साठण्याचे प्रमाण अधिक असते. घोडसह उजनी, जायकवाडी, मांजरा ही धरणे मैदानी प्रदेशातील आहेत. पानशेत, वरसगाव, कोयना ही धरणे डोंगररांगातील आहेत. या धरणातही कालामानाने गाळ साचत असतो. मेरीने दहा वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील धरणात सरासरी ८ ते दहा टक्के गाळ होता. ..........सरकारने गाळ भरून देण्याचा खर्च करावा घोड धरणातील पाण्याचा अचूक हिशेब मांडता यावा यासाठी संबंधित अधिकाºयाने धरणाची क्षमता कमी केली असेल. मात्र, हा त्यावरील उपाय असू शकत नाही. धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम दरवर्षी व्हायला हवा. विशेषत: दुष्काळी वर्षात लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याची कामे हाती घ्यायला हवीत. तसेच, धरण पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण करणे, नदीतील घळीत ठराविक अंतराने सुट्या दगडगोट्यांचे बांध घालून गाळ येण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. अनेकदा गाळ नेण्यासाठी शेतकरी उत्सुक नसतात. सरकारने जेसीबी, त्याचे डिझेल आणि गाळ भरुन देण्याचा खर्च करावा. शेतकºयांना तो वाहून नेण्याचे आवाहन करावे. - डॉ. डी. एम. मोरे, जलतज्ज्ञघोड धरणाचा पूर्वीचा व आजचा साठा (टीएमसीमध्ये)पाणीसाठा प्रकार                                                 पूर्वीची                       आत्ताचीजलाशयाची एकूण क्षमता                                    ७.६३                           ५.९७उपयुक्त पाणीसाठा क्षमता                                  ५.४६                           ४.८७मृत पाणीसाठा क्षमता                                          १.६९                          १.१०

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी