Hadapsar Water Crisis: हडपसर भागात २ दिवस पाणी नाही! दुरुस्तीनंतरही पुरवठा ठप्प; नागरिकांचा महापालिकेवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:23 IST2026-01-31T11:23:18+5:302026-01-31T11:23:30+5:30

Hadapsar Water Crisis: पाणीपुरवठा केंद्रांतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा यंत्रणा वेळेत सुरू होऊ शकली नाही

pune No water in Hadapsar area for 2 days! Supply stopped even after repair; Citizens angry with Municipal Corporation | Hadapsar Water Crisis: हडपसर भागात २ दिवस पाणी नाही! दुरुस्तीनंतरही पुरवठा ठप्प; नागरिकांचा महापालिकेवर संताप

Hadapsar Water Crisis: हडपसर भागात २ दिवस पाणी नाही! दुरुस्तीनंतरही पुरवठा ठप्प; नागरिकांचा महापालिकेवर संताप

हडपसर: हडपसर गावठाण, ससाणेनगर, महंमदवाडी आणि हांडेवाडी परिसरातील हजारो नागरिकांना शुक्रवारी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गुरुवारी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुरवठा सुरू होणे अपेक्षित होते, मात्र दुसऱ्या दिवशीही नळांना पाणी न आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा यंत्रणा वेळेत सुरू होऊ शकली नाही. यामुळे ससाणेनगर, काळे-बोराटे नगर, हांडेवाडी रोड, सातव नगर, महंमदवाडी, गाडीतळ, सातववाडी आणि गोंधळी नगर या भागांत सकाळपासूनच पाण्याचा थेंबही उपलब्ध नव्हता.

महिला आणि नोकरदारांचे हाल

पाणी नसल्यामुळे घरगुती कामे, स्वयंपाक आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला. याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसला. कामावर जाणारे नागरिक आणि शाळकरी मुलांचीही मोठी गैरसोय झाली. पिसोळी पोल्ट्री परिसर, वाडकर मळा, सय्यद नगर, रामटेकडी, माळवाडी आणि मुंढवा या परिसरातही हीच भीषण स्थिती होती.

सकाळी पाणीपुरवठा यंत्रणेत तांत्रिक अडचण आल्यामुळे पाणी सोडता आले नाही. बाधित भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारपासून सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. -तेजस्विनी बागुल, अभियंता, लष्कर पाणीपुरवठा केंद्र.

कालपासून पाणी नाही. महापालिकेने किमान पिण्याच्या पाण्याची तरी पर्यायी सोय करायला हवी होती. - गीतांजली काळे (स्थानिक नागरिक)

सकाळी मुलांना शाळेत पाठवताना आणि स्वतः कामावर जाताना पाण्यासाठी वणवण करावी लागली. या नियोजनाच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? - दीपाली राऊत (स्थानिक नागरिक)

Web Title : हडपसर में जल संकट: आपूर्ति बाधित, निवासी नाराज़

Web Summary : मरम्मत कार्य और तकनीकी समस्याओं के कारण हडपसर के निवासियों को दो दिनों से पानी की भारी कमी का सामना करना पड़ा। पानी की आपूर्ति बाधित होने से दैनिक जीवन प्रभावित, घर और यात्री परेशान। टैंकर अस्थायी राहत प्रदान कर रहे हैं, शनिवार तक सामान्य स्थिति की उम्मीद है।

Web Title : Hadapsar Faces Water Crisis: Supply Disrupted, Residents Angered

Web Summary : Hadapsar residents faced severe water scarcity for two days due to repair work and technical issues. Water supply disruption affected daily life, impacting households and commuters. Tankers are providing temporary relief, with normalcy expected by Saturday.