Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:10 PM2024-04-12T16:10:13+5:302024-04-12T16:12:09+5:30

वार्षिक परीक्षा जवळ आल्याने नापास करतील या भीतीने २ महिन्यापूर्वी घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने घरी कोणालाही सांगितला नाही

pune nmv high school teacher beat up a student with kicks | Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Video: पुण्याच्या नूमवी शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

पुणे: शाळा म्हंटल कि अभ्यासाबरोबरच दंगा, मस्ती, विद्यार्थ्यांकडून नेहमी होतच असते. शिक्षक त्यांना लहान मोठ्या शिक्षा करून धाकात ठेवतात. परंतु त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होईल एवढी मारहाण करत नाहीत. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी शाळेतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षिकेकडून नववीतील विदयार्थ्याला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना मार्च महिन्यात घडली असून त्याबाबत मुलाच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.   

७ मार्चला मुलगा शाळेत गेल्यावर गणित विषयाच्या शिक्षिका श्रीमती बनसोडे या रजेवर होत्या. त्यांच्या जागेवर पूजा सुनिल केदारी वर्गावर ऑफ तासाला बदली शिक्षिका म्हणून आल्या होत्या. त्यावेळेस वर्गातील सर्व मुले ही एकमेकांशी घोळका करून बोलत होते. त्याच दरम्यान केदारी या वर्गावर आल्या. त्यावेळेस सर्व विद्यार्थी इकडेतिकडे पळू लागले. त्यावेळेस त्यांनी या मुलाची कसलीही विचारपूस न करता त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाचे दोन्ही हात पिरगळले, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी या मुलाला  'कोणाला सांगायचे त्याला सांग' अशी धमकी दिली. 

मुलाने हा प्रकार त्याच्या वडिलांनाही सांगितलं नव्हता. कारण त्याची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे नापास करण्याची त्याला भीती होती. परंतु त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्यांच्या पाहण्यात आले. त्यानंतर मुलाला विचारणा केल्यावर त्याने सर्व काही वडिलांना सांगितले. असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत वडिलांनी नमूद केले आहे. तसेच शिक्षिकेच्या अशा वागणुकीची संस्थेने लवकरात लवकर दखल घ्यावी. त्यांच्या कडक कारवाईही करावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली आहे.   

Web Title: pune nmv high school teacher beat up a student with kicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.