ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडकून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:07 IST2026-01-03T18:07:09+5:302026-01-03T18:07:59+5:30
कवठे येमाई : कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गावर उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला धडक लागून कपिल किशोर ...

ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडकून तरुणाचा मृत्यू
कवठे येमाई : कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गावर उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला धडक लागून कपिल किशोर वारे (वय २४, रा. लाखणगाव, ता. आंबेगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात शुक्रवार, २ तारखेस रात्री ११:३० वाजता घडला. अष्टविनायक महामार्गावर उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर रस्त्यावरच थांबवले होते. रस्त्यावरून प्रवास करणारे कपिल किशोर वारे यांची धडक उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला बसली. या अपघातात किशोर वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांची मोटारसायकलही नुकसानग्रस्त झाली आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.