शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची इच्छा नाही; पण कामे वेळेतच झाली पाहिजेत;जिल्हाधिकाऱ्यांकडून मंडल अधिकाऱ्यांना समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:04 IST

- सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार

पुणे : जिल्ह्यात महसूल विभागाच्या मूळ कामकाजावर लक्ष केंद्रीय करण्यात आले असून, ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, सातबारा उतारे, महसुलाची वसुली यांसारख्या कामांचा आता दर पंधरवड्यात आढावा घेतला जाणार आहे. हे कामकाज मंडल अधिकारी करत असल्याने या कामावर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच थेट लक्ष ठेवणार आहेत.

यासाठी या मंडल अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाचारण करून त्यांना कामकाजाचे धडे दिले. 'तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही, पण ते वेळेत झाले पाहिजे,' असे सांगत कामकाज वेळेत करण्याची तंबी दिली. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येते. दरवेळी या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व तहसीलदार उपस्थित राहतात. यामध्ये सुरू असलेली कामे, नवीन उपाययोजना, रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आदींचा आढावा घेतला जातो.मात्र, मंगळवारी (दि. २) पहिल्यांदाच मंडल अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलावण्यात आले. जिल्ह्यातील तब्बल १५४ मंडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी डुडी यांनी नागरिकांना विविध फेरफार वेळेत मिळाले पाहिजेत, पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे, ई-फेरफार, ई-हक्क व ई-चावडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सातबारा उतारे वेळेत दिले पाहिजेत, महसूल वाढवला पाहिजे, मागील सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करणे आणि सर्व अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देणे याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे सामान्यांना सहज सुविधा मिळतील.

दप्तरात त्रुटी दिसल्यास थेट कारवाई होणार सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे. यामध्ये काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. "मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. अयोग्य काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल," असे डुडी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड