मुळा-मुठा नदीतील जलपर्णीवर तातडीने उपाययोजना करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:53 IST2026-04-16T09:52:44+5:302026-04-16T09:53:06+5:30
- पुणे महापालिका, तसेच खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी

मुळा-मुठा नदीतील जलपर्णीवर तातडीने उपाययोजना करा
पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांमध्ये वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी (दि.१५) मुळा रोड आणि होळकर ब्रीज परिसरात पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. तसेच जलपर्णीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
जलपर्णीमुळे डेंगू व मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने ही मोहीम युद्धपातळीवर राबवावी. तसेच भविष्यात जलपर्णी पुन्हा वाढू नये, यासाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या पाहणीवेळी महापालिकेचे आरोग्य विभाग, ड्रेनेज विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
नदीतील प्रदूषण आणि जलपर्णीच्या वाढत्या प्रमाणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत शिरोळे म्हणाले की, जलपर्णीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांवर समाधान न मानता पर्यावरणाचा समतोल राखत जलपर्णीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. हा मुद्दा त्यांनी यापूर्वीही विधानसभेत उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.