नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रकल्पांना चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:35 IST2025-08-30T09:33:54+5:302025-08-30T09:35:18+5:30

- कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

pune news rivers pollution New projects to be promoted for river pollution control | नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रकल्पांना चालना

नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रकल्पांना चालना

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावरदेखील प्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा परिषदेकडून १० नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २९) आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते. नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, "जिल्ह्यात जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट मिसळते.

टप्पा दोनचे प्रस्तावाला गती
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा वाटा वाढत असून, जुलैमध्ये एक लाख ९२ हजार, तर ऑगस्टमध्ये २ लाख १३ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. टप्पा दोनचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच त्याचे काम सुरू होईल. त्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश यावेळी मोहोळ यांनी दिले.तसेच नव्या टर्मिनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरू करण्यात आले असून, माकिंगचे काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pune news rivers pollution New projects to be promoted for river pollution control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.