शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'हे' कार्य करण्यासाठी अल्लाहनेच तुला निवडले असेल कदाचित..! खान यांनी पाळला 'माणुसकीचा धर्म'

By राजू हिंगे | Updated: March 28, 2025 13:29 IST

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!

पुणे : शहराच्या मध्यवस्तीत रास्ता पेठ येथे ज्येष्ठ बहीण-भाऊ राहत हाेते. जवळचे काेणी नसल्याने हे दाेघेच एकमेकांचे आधार हाेते. अचानक भावाला देवाज्ञा झाली आणि बहीण एकटी पडली.मदतीला काेणीच नसल्याने भावावर अंत्यसंस्कार करायचा कसा? असा यक्ष प्रश्न या ज्येष्ठ बहिणीला भेडसावत हाेता. ही बाब उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांना कळाली आणि त्यांनी हातातील सर्व कामे साेडून थेट या बहिणीच्या मदतीसाठी धावले. रमजान आणि गुढीपाडव्याची लगबग सुरू असताना जावेद खान यांनी दाखविलेली माणुसकी पाहून ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या वाक्याचा प्रत्यय आला.रमजान महिना असताना खान यांनी केलेली ही मदत खूप काैतुकास्पद ठरत आहे. रास्ता पेठेत राहणाऱ्या एका ज्येष्ठाचे वयाच्या ७० व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. बहीण वगळता कोणीही नातेवाईक नसल्याने या ज्येष्ठाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न बहिणीला पडला होता. याबाबत मायकल साठे यांनी जावेद खान यांना फोन करून माहिती दिली. अंत्यविधी करतोस का, अशी विचारणाही केली. त्यावर काेणताही विचार न करता जावेद खान यांनी तत्काळ होकार दिला. साठे यांच्याकडून माहिती घेऊन जावेद खान यांनी ससून रुग्णालयातील डेडहाउस गाठले. मृताची बहीण आणि पोलिस हवालदार यांची भेट घेतली. मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती. तरीही रात्रीदेखील अंत्यसंस्कार करू, असे सांगून जावेद खान यांनी दु:खी बहिणीला आधार दिला.यावर त्या बहिणीने ‘आम्ही ब्राह्मण आहोत. सूर्यास्त झाल्यावर अंत्यविधी करत नाही. आपण सकाळी अंत्यविधी करू’ असे सांगत आपल्या अश्रूंना वाट करून दिली. पण, खान यांच्यापुढेदेखील प्रश्न हाेते. कारण, दुसऱ्या दिवशी रमजानची सर्वांत मोठी रात्र होती. तरीही ‘हे कार्य करण्यासाठी अल्लाहनेच तुला निवडले असेल कदाचित’ असे त्यांच्या मनात आले आणि जात, धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकर उठून वैकुंठ स्मशानभूमी गाठली.वैकुंठ स्मशानभूमीत उपस्थित आम्ही सर्वजण सुधीर किंकळे यांचे नातेवाईक झालो. सुधीर किंकळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘धर्म, जाती, प्रांत, भाषा हे द्वेष सारे संपू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे’ ही भावना मनी हाेती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड