शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra highway accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:47 IST

या भीषण धडकेत क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला

इंदापूर ( पुणे जि. ) -  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. १७) सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. लोणी देवकर गावच्या हद्दीत क्रूझर आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), शशांक कोटिया (वय ३२, गौतमनगर, गिरड, ग्वालियर, मध्यप्रदेश) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, त्रिलोकनगर, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.

अधिकच्या माहितीनुसार, लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतून कामगारांना आणण्यासाठी निघालेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रूझरचा (एमएच १४ एलबी १६१३) पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेला जाऊन सोलापूरकडे येणाऱ्या ट्रकला (एमएच १२ वाय क्यू ६६०३) जोरदार धडकली. धडकेनंतर ट्रकनेही दुभाजक ओलांडत क्रूझरला महामार्गाच्या कडेला दाबले, ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला. या दुहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेन व हायड्राच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. इंदापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Highway Accident: Three Workers Killed in Pune-Solapur Collision

Web Summary : A horrific accident on the Pune-Solapur highway near Loni Deokar MIDC resulted in the death of three workers. A cruiser vehicle's tire burst, causing it to collide head-on with a truck. Police are investigating; traffic was disrupted.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसhighwayमहामार्ग