Maharashtra highway accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:47 IST2026-03-17T10:47:13+5:302026-03-17T10:47:13+5:30

या भीषण धडकेत क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला

pune news maharashtra highway accident Terrible accident on Pune-Solapur highway, 3 workers killed | Maharashtra highway accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू

Maharashtra highway accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू

इंदापूर ( पुणे जि. ) -  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. १७) सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. लोणी देवकर गावच्या हद्दीत क्रूझर आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), शशांक कोटिया (वय ३२, गौतमनगर, गिरड, ग्वालियर, मध्यप्रदेश) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, त्रिलोकनगर, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.



अधिकच्या माहितीनुसार, लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतून कामगारांना आणण्यासाठी निघालेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रूझरचा (एमएच १४ एलबी १६१३) पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेला जाऊन सोलापूरकडे येणाऱ्या ट्रकला (एमएच १२ वाय क्यू ६६०३) जोरदार धडकली. धडकेनंतर ट्रकनेही दुभाजक ओलांडत क्रूझरला महामार्गाच्या कडेला दाबले, ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला. या दुहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेन व हायड्राच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. इंदापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title : महाराष्ट्र राजमार्ग दुर्घटना: पुणे-सोलापुर में टक्कर, तीन श्रमिकों की मौत

Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर लोनी देवकर एमआईडीसी के पास एक भीषण दुर्घटना में तीन श्रमिकों की मौत हो गई। एक क्रूजर वाहन का टायर फटने से वह सामने से आ रहे ट्रक से टकरा गया। पुलिस जांच कर रही है; यातायात बाधित हुआ।

Web Title : Maharashtra Highway Accident: Three Workers Killed in Pune-Solapur Collision

Web Summary : A horrific accident on the Pune-Solapur highway near Loni Deokar MIDC resulted in the death of three workers. A cruiser vehicle's tire burst, causing it to collide head-on with a truck. Police are investigating; traffic was disrupted.