तेलाचा १० टक्के कमी वापर आरोग्यासाठी फायदेशीरच? मोदींच्या आवाहनावर पुणेकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:12 IST2026-05-14T10:12:40+5:302026-05-14T10:12:54+5:30

-; दरमहा कुटुंबामागे ७०० ग्रॅमची बचत ! - पंतप्रधान मोदींचे 'आत्मनिर्भर' भारतासाठी आवाहन; पुणेकरांमधून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया ; देशात ६५ ते ७० टक्के खाद्यतेलाची आयात

pune news is 10% less oil consumption beneficial for health? Mixed reactions from Pune residents to Modi's appeal | तेलाचा १० टक्के कमी वापर आरोग्यासाठी फायदेशीरच? मोदींच्या आवाहनावर पुणेकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया

तेलाचा १० टक्के कमी वापर आरोग्यासाठी फायदेशीरच? मोदींच्या आवाहनावर पुणेकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया

पुणे : आखाती युद्धानंतर सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून जहाजांवर हल्ला होण्याच्या भीतीने वाहतुकीचा विमा खर्च भरमसाठ वाढला आहे. खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाली आहे. शिवाय पामतेल उत्पादक देशांच्या बायो-डिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो दहा ते पंधरा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसह तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. यावरून पुणेकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खाद्यतेलाच्या वापरात १० टक्के बचत केल्यास प्रतिकुटुंब दरमहा ५०० ते ७०० ग्रॅम खाद्यतेलाची बचत करू शकते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असून खर्चातील बचतीला हातभार लावणारे असल्याचा सूर उमटत आहे.

खाद्यतेल वापरात १० टक्के कपात केल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकणार असल्याचे काही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान खाद्य तेलाबाबत भारत अद्यापही आत्मनिर्भय नाही. देशात ६५ ते ७० टक्के तेलाची आयात केली जाते. आत्मनिर्भय होण्यासाठी देशातील तेलाचा वापर कमी करावा. जेणेकरून आयात कमी होऊन डॉलरमध्ये खरेदी करणाऱ्या वस्तूची किंमत कमी होऊ शकतील. पूर्वी ४० डॉलर विमा घेतला जात होता, तो ५५ डॉलर प्रति टन घेतला जात आहे. यामुळे परकिय चलन कमी होण्यासाठी डॉलरचा वापर कमी व्हावा यासाठी सरकारने खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे.

- खाद्यतेलाच्या उपलब्धतेत घट

पामतेल उत्पादक इंडोनेशियाने जुलैपासून पेट्रोलमध्ये ५० टक्के पामतेल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. मलेशियाने मिश्रण पातळी १० टक्क्यांवरून २५ टक्के केली आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त खाद्यतेल असलेल्या पामतेलाची उपलब्धता घटणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध प्रकारच्या खाद्यतेल पेंडीच्या निर्यातीवर पाच टक्के अनुदान द्यावे. देशी खाद्यतेल उद्योगाला खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे. रिफाइंड तेल आणि संबंधित उत्पादनांची मुक्त आयात बंद करावी तरच तेलाच्या बाबतीत देश आत्मनिर्भय होवू शकतो असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तेल कपातीमधून ५०० ते ७०० ग्रॅम बचत

शहरात व उपनगरात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्केटयार्ड बाजारात किराणा माल खरेदी करताना एका कुटुंबाला ४ ते ५ लिटर (किलो) तेलाचा वापर करतात. त्याठिकाणी १० टक्के कपात केली तर त्यामागे ५०० ते ७०० ग्रॅम तेल कमी होवू शकते. यातून तेलाची मोठी बचत होवू शकते. याचा आरोग्यासाठी व आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. यातून ५०० ते १ हजार रूपयांची बचत होवू शकते.
-----

- खाद्यतेलाचे सध्याचे दर (प्रति किलो व लिटर)

तेलाचा प्रकार किरकोळ दर घाऊक प्रति किलो दर (१५ किलो/लिटर डबा)

सोयाबीन तेल १६० ते १६५                         २४०० ते २४७५
सूर्यफूल तेल १७५ ते १८०                         २४५० ते २५००

शेंगदाणा तेल १८० - २१०                         २८५० ते २९००
सरकी तेल १५० ते १५५                         २५०० त २५२०पाम तेल             १४५ ते १५०                         २४०० ते २४५०
---
 
तेलाचा अतिवापर देतेय हृदयविकाराला निमंत्रण

बदलती जीवनशैली, तळकट पदार्थांचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत दररोजच्या आहारात तेलाचे प्रमाण किती असावे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तेल पूर्णपणे बंद करण्याऐवजी योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने सेवन करणे अधिक महत्त्वाचे आहे.आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रती व्यक्ती दररोज साधारण ५ ते १० ग्रॅम तेल पुरेसे मानले जाते. यात स्वयंपाकात वापरलेले तेल, तळलेले पदार्थ, फरसाण, बेकरी पदार्थ आणि बाहेरील खाद्यपदार्थांमधील तेलाचाही समावेश होतो.

डॉलर वाचवण्यासाठी आणि परकीय चलनाचा वापर कमी व्हावा यासाठी देशवासीयांनी तेलाचा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे. देशात खाद्यतेलाचा साठा मुबलक आहे. भविष्यात तेलाची टंचाई होवू नये यासाठी खाद्य तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा. हे आरोग्यासाठी आणि आर्थिकदृष्टया फायदेशिर आहे. याला पुणेकरांनी साथ देण्याची गरज आहे. - रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी व माजी अध्यक्ष दी पूना मर्चट चेबर, पुणे. 
 

जानेवारी महिन्यात तेलाचे भाव डब्यामागे २०० रुपये वाढले होते. मात्र मार्चमध्ये पुन्हा कमी होऊन ते भाव आता पुन्हा वाढले आहेत. १५ किलोच्या डबा सध्या २४०० ते २५०० असून आता दर स्थिर आहेत. मात्र भविष्यात कच्च्या तेलावर भारत सरकारने कर वाढवला तर तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकाने तेलाचा योग्य वापर करावा.  - सतवीर गोयल, मार्केटयार्ड   

आहारात अधिक फॅट असलेले तेल, तूप, लोणी यांचे प्रमाण कमी ठेवावे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडईतेल, तिळाचे तेल यांचा आलटून-पालटून वापर केल्यास शरीराला विविध प्रकारचे फॅटी अॅसिड मिळतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलात तळलेले पदार्थ टाळणे हिताचे आहे - डॉ. राहूल सावंत, हृदयरोग तज्ज्ञ.
 
घरातील चार व्यक्तींसाठी महिन्याला साधारण ६०० ते ७५० ग्रॅम तेल पुरेसे ठरते. कुटुंबाच्या एकूण सदस्यसंख्येनुसार तेलाचा वापर ठरवल्यास नियंत्रण ठेवणे सोपे जाते. तेलाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी वाफवलेले, उकडलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. बाहेरील फास्टफूड, वारंवार तळलेले स्नॅक्स आणि रेडीमेड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग्य प्रमाणात तेल, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. - डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्य तज्ज्ञ.

Web Title : पुणे की प्रतिक्रिया: क्या 10% कम तेल स्वास्थ्य के लिए अच्छा है?

Web Summary : खाद्य तेल की बढ़ती कीमतों के बीच, पीएम मोदी की तेल खपत कम करने की अपील पर पुणे में मिली-जुली प्रतिक्रियाएं हैं। विशेषज्ञों का सुझाव है कि यह स्वास्थ्य को बढ़ावा दे सकता है, पैसे बचा सकता है और अर्थव्यवस्था को मजबूत कर सकता है, लेकिन तेल उत्पादन में आत्मनिर्भरता महत्वपूर्ण है।

Web Title : Pune Reacts: Is 10% Less Oil Good for Health?

Web Summary : Amidst rising edible oil prices, PM Modi's call for reduced oil consumption receives mixed reactions in Pune. Experts suggest it can boost health, save money and strengthen the economy, but self-reliance in oil production is vital.