शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; जुन्नरचा शेतकरी दुहेरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:18 IST

- कडाक्याच्या उन्हामुळे शेतात उभे राहणेही कठीण झाले असताना कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना उन्हातच काम करावे लागत आहे.

वडगाव आनंद : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि कृषी संपन्न म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका सध्या भीषण संकटाचा सामना करत आहे. एकीकडे तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडल्याने अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे कांद्याचे कोसळलेले बाजारभाव आणि वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी निसर्ग आणि अर्थकारणाच्या कात्रीत सापडला आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे शेतात उभे राहणेही कठीण झाले असताना कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना उन्हातच काम करावे लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पावसाळ्यात वापरली जाणारी छत्री आता उन्हापासून बचावासाठी वापरावी लागत आहे. शेतात मजूर आणि महिला डोक्यावर छत्री धरून कांदा उपटताना दिसत असून हे चित्र अत्यंत विदारक आहे.

कांदा पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. लागवड, खते, औषध फवारणी आणि मशागत मिळून शेतकऱ्याला एकरी किमान ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. मात्र, बाजारात मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने हा खर्चही परत मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत गुंतवलेल्या भांडवलाच्या ५० टक्के रक्कमही हाती पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेला कांदा मातीमोल दराने विकावा लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

मजुरीचा वाढता बोजा

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कामाचे तास कमी झाले असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी मजुरीचे दर वाढले आहेत. कष्टाने कांदा काढूनही मजुरी देताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

उष्माघाताचा धोका वाढला

तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही शेतकरी आणि मजूर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

एकूणच, जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, शासनाने तातडीने दखल घेऊन ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Junnar Farmers Face Double Blow: Heatwave, Low Onion Prices

Web Summary : Junnar farmers grapple with scorching heat and plummeting onion prices. Rising labor costs exacerbate the crisis, leaving farmers struggling to recover investments. The government is urged to provide immediate financial assistance to alleviate their distress.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSummer Specialसमर स्पेशल