शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
3
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
4
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
5
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
6
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
7
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
8
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
9
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
10
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
11
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
12
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
13
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
14
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
15
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
16
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
17
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
18
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
19
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
20
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ऊन, रात्री थंडीचा कडाका; वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:30 IST

या तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून सर्दी, खोकला व श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून पुणे शहरात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री बोचरी थंडी अशी दुतोंडी हवामानाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. दिवसभर कमाल तापमान साधारण ३० ते ३२ अंशांपर्यंत पोहोचत असून रात्री किमान तापमान ११ ते १३ अंशांवर घसरत आहे. या तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून सर्दी, खोकला व श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

महापालिकेचे दवाखाने, कमला नेहरू रूग्णालय, ससून रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये श्वसनाच्या संसर्गाने त्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दमा, ॲलर्जी असलेल्या रुग्णांना या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसत आहे. लहान मुलांच्या आरोग्यावरही या बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होत आहे. दिवस-रात्र तापमानातील अचानक बदलामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वसनाचा त्रास यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रौढांसह वयोवृद्धांमध्येही सर्दी, खोकल्याच्या संसर्ग वाढला आहे. नाक बंद होणे, घसा दुखणे, ॲलर्जिक खोकला, श्वास घेताना दम लागणे, या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

थंडीत घ्यावयाची काळजी :

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झोप आणि विश्रांती महत्त्वाची आहे. कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे, घसा खवखवत असल्यास कोमट पाण्याने गुळण्या, दिवसातून २–३ वेळा साधी वाफ घ्यावी. आइस्क्रीम, थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स टाळा. बाहेर जाताना विशेषत: धूळ, प्रदूषण किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. हात वारंवार स्वच्छ धुणे, घरात व्हेंटिलेशन ठेवा. हळदीचे दूध, मध-आलं-लिंबाचा काढा, व्हिटॅमिन सी युक्त फळे (लिंबू, संत्रे, मोसंबी) भरपूर पाणी याचा अवलंब करा. स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नका, तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला राहिल्यास, लहान मुलांमध्ये श्वास फुलणे, छातीत घरघर, वृद्ध व्यक्तींमध्ये दमा, हृदयाच्या तक्रारी वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत. 

शहरातील धुळ प्रदूषणाची गंभीर स्थिती ; यंत्रणांचे दुर्लक्ष :

शहर आणि उपनगरांमध्ये इमारत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यातून उडणारी धुळ नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका बनली आहे. बांधकामस्थळी धुळ दाबण्यासाठी पाणी मारणे, धुळ प्रतिबंधक जाळ्यांचा वापर करणे गरजेचे असताना अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. याबरोबरच बांधकामातील डेब्रिज, वाळू क्रश सँड वाहतुकीदरम्यान पाणी मारणेख ताडपत्रीचा वापर करणे,

हे नियम असले तरी अंमलबजावणी मात्र शून्य आहे. शहरालगतचे स्टोन क्रशर, प्री-मिक्स प्लांट आणि क्रशिंग युनिट्स सतत धुळीचे ढग उडवत असून संबंधित यंत्रणाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची नाराजी आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

वाढती थंडी व बदलत्या वातावरणात नागरिकांना विशेष काळजी घ्यावी. तापमानानुसार कपड्यांचा योग्य वापर, कोमट पाणी पिणे, धुळीत मास्क वापरणे लहान मुले व वृद्धांनी थंडीत बाहेर जाणे टाळावे, घरात स्वच्छता व हवा खेळती ठेवणे गरजेचे आहे. वाढत्या व घटत्या तापमानातील तफावतीमुळे श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना सावधगिरी बाळगावी. - डाॅ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका 

तापमानातील अचानक बदलामुळे वातावरणातील विषाणूंचे प्रकार व प्रमाण बदलले जाते. नवीन विषाणू लहान मुलांना लगेच संसर्ग करू शकतात परंतु लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी हे विषाणू नवीन असल्यामुळे विषाणूंना ते आटोक्यात ठेवू शकत नाहीत. घरात आणि शाळेत तापमानातील तफावत जास्त असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी मुलांना कोमट पाणी पाजणे, थंडीत उबदार कपडे घालणे, धुळीत खेळणे टाळणे आणि आजारी असल्यास योग्य विश्रांती देणे महत्त्वाचे आहे.  - डॉ. ललितकुमार धोका, बालरोग तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Weather: Day Heat, Night Cold; Pollution Fuels Coughs, Colds

Web Summary : Pune faces dual weather: hot days and cold nights, exacerbating pollution. This causes a rise in cough, cold, and respiratory issues, especially among children, the elderly, and those with allergies. Doctors advise precautions like warm water, masks, and avoiding cold items.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHealthआरोग्य